Maharashtra Assembly : विधानसभेतील 6 जण वरच्या वर्गात; 8 जण पुन्हा त्याच बाकावर!

Maharashtra MLA Became Member of Parliament : विधानसभेतील 6 खुर्च्या झाल्या रिकाम्या! आमदार बनले खासदार; 8 आमदार त्याच बाकावर बसून करणार कारभार
Maharashtra MLA became MP
Maharashtra MLA became MPSarkarnama

Lok Sabha Election Analysis : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत 6 विद्यमान आमदार खासदार बनले तर 8 विद्यमान आमदार आपटले. त्यामुळं येत्या 27 जूनपासून सुरू होत असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या कालावधीत विधानसभा सभागृहातील 6 आमदारांच्या खुर्च्या रिकाम्या झाल्या आहेत.

विधानसभेचे 6 आणि विधानपरिषदेचे 2 असे एकूण 8 विद्यमान आमदार पुन्हा आपापल्या बाकावर बसून कारभार हाकणार आहेत.

महाराष्ट्रातील विविध पक्षांनी आपापले विद्यमान आमदार उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. विधानसभेचे 12 आणि विधानपरिषदेचे 2 असे एकूण 14 आमदार खासदार होण्यासाठी निवडणूक लढले. त्यातल्या 6 आमदारांचा विजय झाला तर 8 जणांचा पराभव झाला.

भाजपनं एका मंत्री आमदारासह 3, तर शिवसेना शिंदे गटानं एका मंत्री आमदारासह 3 जणांना लोकसभेचं तिकीट दिलं होतं. काँग्रेसनं देखील आपल्या 6 आमदारांना खासदारकीसाठी नशीब आजमावण्याची संधी दिली होती. राष्ट्रवादी शरद पवार Sharad Pawar गटानं विधानपरिषदेचे सदस्य शशिकांत शिंदे यांना लोकसभेचं तिकीट दिलं होतं. राष्ट्रीय समाज पक्षाकडून स्वतः विधानपरिषद सदस्य असलेले महादेव जानकर निवडणूक रिंगणात होते.

Maharashtra MLA became MP
Maharashtra BSP : बसपाची संपूर्ण प्रदेश कार्यकारिणीच बरखास्त; काय आहे कारण?

कोणते विद्यमान आमदार बनले खासदार ?

1. वर्षा गायकवाड (काँग्रेस)

2. प्रणिती शिंदे (काँग्रेस)

3. बळवंत वानखेडे (काँग्रेस)

4. प्रतिभा धानोरकर (काँग्रेस)

5. संदीपान भुमरे (शिवसेना शिंदे गट)

6. रवींद्र वायकर (शिवसेना शिंदे गट)

खासदारकीला पराभूत झालेले विद्यमान आमदार

1. सुधीर मुनगंटीवार (भाजप)

2. राम सातपुते (भाजप)

3. मिहिर कोटेचा (भाजप)

4. यामिनी जाधव (शिवसेना शिंदे गट)

5. विकास ठाकरे (काँग्रेस)

6. रवींद्र धंगेकर (काँग्रेस)

7. शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी शरद पवार गट)

8. महादेव जानकर (रासप)

Maharashtra MLA became MP
Vishal Patil : विशाल पाटलांचा आवाज दिल्लीतही घुमला, संसदेबाहेर...

तिकडं लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर निलेश लंके Nilesh Lanke यांनी पारनेरच्या आमदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादी अजित पवार गटातून राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आणि नगर दक्षिण लोकसभेचं तिकीट मिळवलं, तर काँग्रेसच्या राजू पारवे यांनी उमरेडच्या आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेसमधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून रामटेक लोकसभा लढवली.

लंके अन् पारवेंचं काय झालं?

निलेश लंके खासदार बनून दिल्लीत गेले पण राजू पारवे यांना दिल्ली तर सोडाच आमदारकीचा राजीनामा दिल्यानं आता त्यांना मुंबईला जाणं देखील मुश्किल होऊन बसलं. खासदार तर बनता आलं नाहीच पण त्यांची आमदारकीही गेली.

एकूणच काय तर 14 विद्यमान आमदार खासदार होण्यासाठी लोकसभा निवडणुकीत उतरले खरे पण त्यातले 6 वरच्या वर्गात गेले तर 8 जण पुन्हा एकदा त्याच बाकावर येऊन बसले.

(Edited by Sunil Dhumal)

Maharashtra MLA became MP
Sharad Pawar : 'तुतारी' अन् 'पिपाणी'तला घोळ मिटणार? शरद पवार गटाचं मोठं पाऊल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com