Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार पडताच एक्झिट पोलच्या आकड्यांनी देशातील वातावरण तापले आहे. हे आकडे नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवणार यात काही शंका नाही. मात्र, तेच आकडे महाराष्ट्रातून भाजपला धक्का देताना दिसत आहे.
राज्यातून 'मिशन 45' यशस्वी होत नसतानाही देशात मात्र भाजप आरामात सरकार स्थापन करणार असल्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील आकड्यांचा खड्डा भाजपने ( bjp ) इतर राज्यातून भरून काढल्याचे एक्झिट पोलनुसार स्पष्ट होत आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार असला तरी त्यापूर्वीच विविध एजन्सींच्या एक्झिट पोलने हे चित्र आताच काही अंशी स्पष्ट केले आहे. या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्र, राजस्थान, हरयाणा आणि कर्नाटकमध्ये भाजपला नुकसान होताना दिसत आहे. मात्र, याची भरपाई पश्चिम बंगाल, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, आसाम आदी राज्यांतून भाजप करण्याचा अंदाज आहे.
दक्षिणेत एन्ट्री
या निवडणुकीत भाजप कधी नव्हे ते केरळमध्ये आपले खाते खोलण्याची शक्यता आहे. येथे भाजप 1ते 3 जागा जिंकू शकतो. चाणक्य एजन्सीनुसार तामिळनाडूमध्ये भाजपला 10 जागा मिळतील. आंध्र प्रदेशातही भाजपला 4 ते 6 जागा मिळू शकतात. या राज्यांतून भाजपला 2019 मध्ये एकही जागा मिळवता आली नव्हती. तर इतर एजन्सी तामिळनाडूत भाजप तीन जागा जिंकणार असल्याचे सांगतात. तेलंगणा आणि पश्चिम बंगालमध्येही भाजपला चार जागांचा फायदा होताना दिसत आहे. तसेच, आसाममध्ये 'एनडीए'ला 12 जागा मिळू शकतात. पंजाबमध्येही भाजपला 2 ते 4 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महाराष्ट्रात भाजपचे नुकसान?
महाराष्ट्रात भाजपचे सर्वाधिक नुकसान होऊ शकते, अशी चर्चा होती. परंतु, शिवसेना फुटल्याने भाजपच्या जागांची संख्या 23 वर आली. 'एनडीए'ला राज्यात 29 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यातील 18 जागा या भाजपच्या असतील, असा अंदाज आहे. बिहारमध्ये 'एनडीए'ला 33 जागा मिळतील. गेल्या निवडणुकीत 'एनडीए'ला 39 जागा मिळाल्या होत्या. येथे भाजपऐवजी मित्रपक्षांच्या जागा कमी होताना दिसत आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अपेक्षितपणे काम केले नसल्याचा परिणाम असणार आहे.
या राज्यांमध्ये फटका
एक्झिट पोलनुसार कर्नाटक, राजस्थान आणि हरियाणा या राज्यांमध्ये भाजपचे थेट नुकसान होण्याची शक्यता आहे. कर्नाटकात भाजपने गेल्या वेळी 26 जागा जिंकल्या होत्या, यावेळी त्यांना 22 जागा मिळतील. तर राजस्थानमध्ये गेल्या वेळी 25 जागा मिळाल्या होत्या. यावेळी भाजप 20 जागा मिळण्याची शक्यता आहे. हरयाणातील तीन जागा कमी होऊन भाजपला सात जागा मिळण्याची शक्यता आहे.
400 पार होणार...
निवडणुकीआधीच भाजपने '400 पार'चा नारा दिला होता. मात्र, अनेक एजन्सींनी भाजपचे स्वप्न-स्वप्नच राहणार असल्याचे सांगितले. पण, काही संस्थानी हे स्वप्न साकार होण्याची शक्यता वर्तवली आहे. बहुतांश संस्थांच्या आकड्यांनुसार 'एनडीए'ला 290 ते 360 जागा मिळू शकतात. तर भारत आघाडीला 120 ते 160 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर 'चाणक्य'च्या एक्झिट पोलने 'एनडीए'ला 400 जागा मिळण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.