Maharashtra municipal elections 2025 : राज्यातील महापालिकेच्या निवडणुका नोव्हेंबर, डिसेंबरमध्येच होण्याची शक्यता

Municipal elections November December News : दोनच दिवसापूर्वी राज्यातील महापालिकेने प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. त्याबाबतचे नोटिफिकेशन काढण्यात आल्याने प्रभाग रचनेचे काम लवकरच सुरु होणार आहे.
Local Body Election
Local Body ElectionSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : सुप्रीम कोर्टाने महिनाभरापूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चार महिन्याच्या आत घेण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला होता. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आय आदेशानंतर आता निवडणुकीची तयारी सुरु करण्यात आली आहे. दोनच दिवसापूर्वी राज्यातील महापालिकेने प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. त्याबाबतचे नोटिफिकेशन काढण्यात आल्याने प्रभाग रचनेचे काम लवकरच सुरु होणार आहे. हे प्रभाग रचनेचे काम साधरणपणे दोन महिने चालणार असून त्यानंतर 15 सप्टेंबरपासून प्रभागनिहाय आरक्षण निश्चिती केली जाणार आहे.

त्यासोबतच प्रभागनिहाय मतदार याद्यांचे पुनरिक्षण करण्यात येणार आहे. त्यासोबतच आरक्षण निश्चिती करण्यास महिनाभराचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे निवडणुकीची अधिसूचना १५ ऑक्टोबरनंतर लागू शकते. त्यामुळे महापालिकेची निवडणूक नोव्हेंबर, डिसेंबरमध्येच होण्याची शक्यता अधिक आहे.

Local Body Election
Anil Deshmukh : प्रभाग रचनेचे नोटिफिकेशन तरी अनिल देशमुख म्हणतात, 'निवडणूक होईलच याची गॅरंटी नाही'

सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर त्वरित निवडणूक आयोगाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी युद्धपातळीवर हाती घेतली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून (Election Commission)तयारी सुरु करण्यात आली असून सर्वच यंत्रणा आतापासूनच कामाला लागली आहे. त्यामुळे येत्या काळात लवकरच निवडणूक कार्यक्रम ठरवण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.

Local Body Election
Eknath Shinde : शिंदेच्या सेनेने पोखरले; भाजपमध्ये जाणाऱ्यांचे वेट अँड वॉच, इच्छुकांना आश्वासक नेतृत्वच सापडेना !

राज्यातील विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणे अपेक्षित आहे. त्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला जाऊ शकतो. त्यासोबतच २० ऑक्टोबर दरम्यान दिवाळी असल्याने दिवाळीनंतरच राज्यातील निवडणुकीचा बार उडण्याची शक्यता अधिक आहे. त्यादृष्टीनेच निवडणूक आयोगाकडून पावले उचलली जात आहेत. त्यामुळे सर्वांचे निवडणुकीच्या घोषणेकडे लागले आहे.

Local Body Election
Kolhapur Election: यंदा कोल्हापूर महापालिकेची लढाई सोपी नसणार, मातब्बर नेत्यांसह इच्छुकांनाही घाम फोडणार; 'हे' मोठं कारण आलं समोर

आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे सर्वच प्रमुख पक्षांनी स्थानिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. राजकीय पक्षाने निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती (Mahayuti) व महाविकास आघाडी एकत्रित लढणार की स्वबळावर लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Local Body Election
Raj Thackeray political stance : राज ठाकरेंच्या भूमिकेविषयी सस्पेन्स कायम; भाऊ की देवाभाऊ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com