
kolahpur News : लोकसभा निवडणुकीत शिंदे यांच्या शिवसेनेला फिफ्टी-फिफ्टी यश मिळवले. विधानसभा निवडणुकीत शिंदे यांच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट 100 टक्के होता. एकूणच महायुतीची गाडी विधानसभा निवडणुकीत सुसाट धावली. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महायुतीला फटका बसेल, अशी शक्यता वर्तवली जात असताना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीचा प्रभाव विधानसभा निवडणुकीत दिसून आला. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात मंत्रिपदावर शिंदेंच्या शिवसेनेने आश्वासक चेहरा दिला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत इच्छुकांचा ओढा शिंदेंच्या शिवसेनेकडे अधिक आहे. त्या मागची कारणे देखील अनेक आहेत. त्या तुलनेत भाजप आणि राष्ट्रवादीकडे इच्छुकांचा ओढा कमी आहे.
आगामी कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदे यांच्या शिवसेनेकडे (Shivsena) इच्छुकांचा अधिक ओढा आहे. राज्यात असलेला सत्तेचा फायदा निवडून आल्यानंतर अशी आशा इच्छुकांना आहे. केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवर महायुतीची सत्ता असल्याने त्याचा फायदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत होईल असा अंदाज इच्छुकांना आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नेतृत्वाचा चेहरा म्हणून पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सत्यजित उर्फ नाना कदम आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) एक कार्यकर्त्यांच्या भावनांना वाव देतात. याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे सहाजिकच महापालिकेच्या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचा फायदा होईल, असा अंदाज बांधत इच्छुकांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाणे पसंत केले आहे.
भाजपमधील परिस्थिती पाहता सध्या भाजपकडे इच्छुकांचा ओढा फारसा दिसत नाही. त्यांच्याकडे नेतृत्वाचा आश्वासक चेहरा दिसत नसल्याचे चित्र आहे. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे जास्त काळ पुणे येथेच असतात.
राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक सध्या तरी त्यांच्या गटापुरतेच मर्यादित दिसतात. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत बळ देण्यासाठी भाजपमध्ये येणाऱ्या इच्छुकांना आश्वासक नेतृत्वाची गरज वाटत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातील परिस्थिती हीच आहे. कोल्हापूर महानगरपालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे नेतृत्वाचा आश्वासक चेहरा नाही. हे देखील शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ हे कागल विधानसभा मतदारसंघातच अधिक आहेत. त्यामुळे शहरातील कार्यकर्त्यांना आणि इच्छुकांना म्हणावा तसा वेळ देतील, याची शाश्वती इच्छुकांना नाही.
भाजपमधील मंत्र्यांना आणि राष्ट्रवादीतील मंत्र्यांना भेटण्यासाठी मधल्या फळीतील पदाधिकाऱ्यांचा सामना या इच्छुकांना करावा लागत आहे. याउलट शिंदेंच्या शिवसेनेत थेट संपर्क होत असल्याने इच्छुकांचा कल शिंदे यांच्या शिवसेनेकडे दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.