Uddhav Thackeray News : मनीषा कायंदेंमुळे ठाकरे गटाची अडचण; विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदही जाणार?

Legislative Council News : विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी रविवारी (१८ जून) शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला.
Uddhav Thackeray News :
Uddhav Thackeray News :Sarkarnama
Published on
Updated on

Manisha Kayande News : विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी रविवारी (१८ जून) शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. वर्षभरापूर्वी 40 आमदारांना बरोबर घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आघाडी सरकारला धक्का दिला. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे सरकार कोसळले.

मात्र, विधान परिषदेत ठाकरे गट हा दुसरा सर्वात मोठा पक्ष होता. विधान परिषदेत ठाकरे गटाकडे १० आमदार होते. त्यामुळे टाकरे गटाकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे सध्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. मात्र, कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटाची संख्या कमी झाली आहे.

Uddhav Thackeray News :
Beed Loksabha News : मागच्या लोकसभेला सात आमदार, आता तिघेच ; डाॅ. मुंडेंना ताकद लावावी लागणार..

विधान परिषदेत ठाकरे गटाकडे १० तर शिंदे गटाकडे एकच आमदार होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ९ आमदार आहेत. दरम्यान, कायंदे यांनी ठाकरे गटाला रामराम केल्यामुळे विधान परिषदेत ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या दोन्ही पक्षांकडे प्रत्येकी ९ आमदार राहिले आहेत. त्यातच विधान परिषदेचे उप सभापतीपद ठाकरे गटाकडेच आहे. निलम गोऱ्हे सध्या उपसभापती आहेत.

त्यातच सध्या विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद ठाकरे गटाकडे. मात्र, मनीषा कायंदे यांच्या जाण्याने ठाकरे गटाचे विधान परिषदेतले संख्याबळ घडले आहे. त्यामुळे आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद जाणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाकडे सारखेच संख्याबळ आहे. तर काँग्रेसकडे (Congress) ८ जागा आहेत.

Uddhav Thackeray News :
Girish Mahajan News : नाशिकच्या वैद्यकीय महाविद्यालयाबाबत गिरीश महाजनांचं मोठं विधान; म्हणाले...

मात्र, महाविकास आघाडी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्याची शक्यता तसी कमीच आहे. त्यामुळे सध्या तरी हे पद ठाकरे गटाकडेच राहु शकते. मात्र, मनीषा कायंदे यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे ठाकरे गटाची डोकेदुखी वाढली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com