Girish Mahajan News : नाशिकच्या वैद्यकीय महाविद्यालयाबाबत गिरीश महाजनांचं मोठं विधान; म्हणाले...

Nashik News : व्हिसा नाकारणारे आता मोदींसाठी देणार तोफांच्या सलामी
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Girish Mahajan On Nashil Medical College : सर्वच क्षेत्रात सर्वांची प्रगती साधणारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळातील सुवर्णाक्षरांनी लिहिले जावी, अशी नऊ वर्षांची कारकीर्द आहे. एकेकाळी मोदींना व्हिसा नाकारणाऱ्या अमेरिकेकडून आता त्यांच्यासाठी पायघड्या घातल्या जात आहेत, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केले. यावेळी त्यांनी नाशिक येथे होणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाबाबतही मोठे वक्तव्य केले. त्यामुळे हे महाविद्यालय कधी सुरू होणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)

Girish Mahajan
Sharad Pawar News : अमळनेरला आता भाकरी फिरवण्याची वेळ आलीये ? शरद पवारांच्या दौऱ्यानं..

नाशिक महानगर व्यापारी आयोजित व्यापारी सुसंवाद कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन बोलत होते. महाजन यांनी यावेळी मोदी सरकारच्या कामाचा आढावा घेतला. ते म्हणाले, भारत देश सुरक्षित झाला आहे. चीन किंवा पाकिस्तानची आपल्याकडे वाकड्या नजरने पाहण्याची हिंमत नाही. भारतामध्ये डिजिटल क्रांती झालेली आहे. लघुउद्योग व सूक्ष्म उद्योग यांच्यासाठी अनेक प्रोत्साहन योजना केंद्र शासनाने अमलात आणल्या आहेत. भारताची जीडीपी झपाट्याने वाढत आहे. यामुळे भारत देश खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर झाला आहे.

यावेळी नाशिक येथे सुरू होणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालय लवकरच सुरू होईल, असा विश्वासही गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, "शासनाच्या निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले जाणार आहे. त्यानुसार राज्यभर काम सुरू आहे.नाशिक जिल्ह्यासाठीही वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले असून ते लवकरच सुरू होईल. या महाविद्यालयात 2024 च्या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश प्रक्रिया सुरू होईल."

Girish Mahajan
Manisha Kayande News : भाजपमध्ये असतानाही नेहमीच शिवसेनेचं काम केलं; असं का म्हणाल्या मनिषा कायंदे

यावेळी त्यांनी अमेरिका आणि भारताचे संबंध अधिक घट्ट झाल्याचे सांगितले. ते म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने जागतिक नेतृत्व उदयास आले आहे. त्यांच्या या नेतृत्वामुळे भारत देशाची मान जगभर उंचावली. आता जगभरातील लोक भारतीयांकडे सन्मानाने पाहू लागले आहेत. एकेकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेने व्हिसा नाकारला होता. आता तोच अमेरिका देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानासाठी 21 तोफांची सलामी देणार आहे."

Girish Mahajan
BJP's Mission Baramati : मिशन बारामतीसाठी भाजपचा संग्राम थोपटेंसाठी ‘ट्रॅप’; भोरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीत शीतयुद्ध

आमदार देवयानी फरांदे यांनी केंद्र शासनाच्या अनेक उपक्रमावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या., जीएसटीमुळे कर प्रणाली सुटसुटीत झाली आहे. भारतीय जनता पार्टी व्यापाऱ्यांच्या पाठीशी आहे, असे आरोप-प्रत्यारोप विरोधी पक्ष करत असतात. मात्र व्यापार आणि उद्योग आणि वाढला नाही तर देशाची प्रगती होईल कशी होणार? व्यापाऱ्यांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com