Narayan Rane - Milin Narvekar : सब गिले शिकवे भुल के,'मिलिंद नार्वेकर अन् नारायण राणे' यांची भेट

Narayan Rane - Milin Narvekar : उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर आणि नारायण राणे यांची 20 वर्षांनंतर भेट झाली.
Milind Narvekar and Narayan Rane
Milind Narvekar and Narayan RaneSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : उद्धव ठाकरे आणि नारायण राणे या दोन नेत्यांमधील वैर महाराष्ट्राला सर्वश्रृत आहे. 2005 मध्ये नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर आजपर्यंत दोन्ही बाजूंनी एकमेकांवार यथेच्छ टीका झाली आहे. सध्या दिशा सालियान मृत्यू प्रकरणात मंत्री नितेश राणे यांच्या रडारवर आमदार आदित्य ठाकरे आहेत. अशात नुकतेच उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर आणि नारायण राणे यांची भेट झाली. सब गिले शिकवे भूल के दोन्ही नेते हसत हसत एकमेकांना भेटल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनासाठी मिलिंद नार्वेकर आमदारही नियमितपणे विधिमंडळात येत आहेत. बुधवारी नारायण राणे मंत्री नितेश यांचे कार्यालय पाहायला विधिमंडळात आले होते. परत निघाले तेव्हा नार्वेकर विधिमंडळाच्या दारावर उभे होते. जाताना कोणी तरी राणेंना विचारले, नार्वेकरांना भेटणार नाही का? राणे लगेच मोठ्या मनाने 'भेटू या की' म्हणाले. मग नार्वेकरही 4 पावले पुढे आले. राणे यांनी हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. मिलिंद नार्वेकर यांनीही जुन्या गोष्टी विसरून हात मिळवणी केली.

खरंतर शिवसेना सोडल्यानंतर मिलिंद नार्वेकर आणि राणे यांच्यामध्येही गाठ पडली होती. उद्धव ठाकरे शिवसेनेचा कारभार सक्रियपणे बघू लागले तेव्हा नारायण राणे, राज ठाकरे काहीसे नाराज झाल्याची चर्चा होती. याच नाराजीतून राणे यांनी शिवसेना सोडली. राणेंपाठोपाठ राज ठाकरे यांनीही शिवसेना सोडली. त्यावेळी मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे खाजगी सचिव होते. राज ठाकरे आणि राणे यांच्याशी उद्धव ठाकरे यांचा बेबनाव सुरू झाला तेव्हा नार्वेकर वाद पेटवत असल्याची चर्चा होती.

Milind Narvekar and Narayan Rane
Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंच्या मनात बंडाची भीती? शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आणला 'हा' महत्त्वाचा प्रस्ताव

मागच्या 20 वर्षांमध्ये राणे 15 वर्षे काँग्रेसवासी राहिले. आता भाजपमध्ये स्थिरावले आहेत. केंद्रीय मंत्री राहिले, खासदार झाले. नार्वेकर आमदार झाले आहेत. तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे मनोमिलन झाले आहे. सध्या तरी विजयी मेळाव्यात एकत्र भेटणार आहेत. निवडणुकीच्या रणांगणात एकत्र येणार की नाही हे यथावकाश समोर येईलच. पण दोघे काही पावले एकत्र टाकणार आहेत, एवढे मात्र खरे. पण राज यांच्याप्रमाणेच नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांचे मनोमिलन होणे जवळपास अशक्य आहे हेही तितकेच खरे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com