
PM Modi Government 11 Years : मोदी सरकारला आता ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. भाजपसाठी एक अतिशय मोठी उपलब्धी आहे. या सरकारच्या ११ वर्षांच्या कालखंडात अनेक मोठे, ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतले गेले. ज्याची दखल संपूर्ण जगानेही घेतली. यामुळेच जनतेचा मोदी सरकारवरील विश्वास अधिक वाढल्याचेही लोकसभा निवडणूकांच्या निकालातून दिसून आले. नरेंद्र मोदींनी ९ जून २०२४ रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. या पार्श्वभूमीवर मागील वर्षभरात मोदी सरकारने घेतलेल्या दहा मोठ्या निर्णयाबाबत आपण माहिती घेवूयात.
जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात पहलगामजवळ बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. ज्यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले. यानंतर भारताने या हल्ल्याचा जबरदस्त प्रत्युत्तर देण्यासाठी दहशतवादी आणि पाकिस्ताविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवले ज्याची दखली संपूर्ण जगाने घेतली. कारण, यानंतर पाकिस्तानला अखेर माघार घ्यावी लागली.
मोदी सरकारने नवा वक्फ कायदा आणला, वक्फ दुरूस्ती विधेयक ३ एप्रिल रोजी लोकसभेत २३२ मतांनी आणि ४ एप्रिल रोजी राज्यसभेत ९५ मतांनी मंजूर झाले. त्यानंतर ५ एप्रिल रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले.
२०२५च्या केंद्रीय अर्थसंकल्पातून पंतप्रधान मोदींनी मध्यवर्गीयांना मोठा दिलासा दिला. १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर न लावण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. यामुळे देशभरातील नोकरदार मध्यवर्गीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
मोदी सरकारने दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेतलेली असतानाच, दुसरीकडे देशांतर्गत शत्रूंचाही नायनाट करण्यासाठी नक्षलवादावरही जोरदार प्रहार केला. २०२६ पर्यंत देशातून नक्षलवादाचे समूळ उच्चाटण करण्याचा निर्धार केला गेला आहे आणि त्यानुसार कारवाई सुरू आहेत.
२५ डिसेंबर २०२३ रोजी राष्ट्रपती मुर्मू यांनी भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय नागरी संरक्षण संहिता २०२३ आणि भारतीय पुरावा कायदा २०२३ यांना मान्यता दिली. हे नवीन फौजदारी कायदे १ जुलै २०२४ पासून लागू झाले.
एक राष्ट्र एक निवडणूक हे मोदी सरकारचे स्वप्न आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने १२ डिसेंबर२०२४ रोजी बहुचर्चित एक राष्ट्र एक निवडणूक विधेयकाला मंजुरी दिली. जे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणूक घेण्याच्या प्रस्तावाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
१८ सप्टेंबर रोजी व्हीनस ऑर्बिटर मिशन (VOM) च्या विकासाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट चंद्र आणि मंगळाच्या पलीकडे शुक्र ग्रहाचा शोध घेणे व त्याचा अभ्यास करणे आहे.
आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना (AB-PMJAY) अंतर्गत ७० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांचे उत्पन्न काहीह असो, आरोग्य कवचाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या निर्णयाचा सुमारे सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांना फायदा होण्याची शक्यता आहे. त्यांना AB-PMJAYअंतर्गत कुटुंब आधारावर दरवर्षी पाच लाख रुपयांचे मोफत आरोग्य विमा संरक्षण मिळेल, जे आतापर्यंत फक्त गरीब आणि असुरक्षित कुटुंबाना उपलब्ध होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, लडाख या केंद्रशासित प्रदेशात पाच नवीन जिल्हे निर्माण केले जातील. त्यांची नावे झंस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग अशी आहेत. प्रत्येक रस्त्यावर व परिसरात प्रशासन मजबूत करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. या घोषणेआधी लडामध्ये केवळ लेह व कारगिल हे दोनच जिल्हे होते.
INS अरिघाट ऑगस्ट २०२४ मध्ये विशाखापट्टणम येथे भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला. यामुळे भारतीय नौदलाची ताकद वाढली. भारताने २०२४मध्ये त्यांची दुसरी अणुऊर्जेवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी आयएनएस अरिघाट लाँच केली, जी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडमध्ये समाविष्ट करण्यात आली.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.