Narayan Rane : नारायण राणेंचं हेलिकॉप्टर अचानक बेपत्ता झालं अन्... काय होता यंत्रणांना घाम फोडणारा प्रसंग?

Narayan Rane helicopter missing 1999 : हेलिकॉप्टर वादळी वाऱ्यात आणि जोरदार पावसात सापडले आणि नियंत्रण कक्षाशी तासभर संपर्क तुटल्याने शासकीय यंत्रणांची चांगलीच धावपळ उडाली.
Narayan Rane
Narayan RaneSarkarnama
Published on
Updated on

16 मे 1999 चा तो दिवस... सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री नारायण राणे मुंबईकडे परत येत होते. परंतु या प्रवासात असा एक थरारक प्रसंग घडला. ज्याने सर्व शासकीय यंत्रणांना अक्षरशः धडकी भरली. सगळं काही सुरळीत सुरू असताना अचानक आकाशात काळे ढग दाटून आले. हेलिकॉप्टर वादळी वाऱ्यात आणि जोरदार पावसात सापडले आणि नियंत्रण कक्षाशी तासभर संपर्क तुटल्याने शासकीय यंत्रणांची चांगलीच धावपळ उडाली.

मुख्यमंत्री राणेंसोबत पाटबंधारे खात्याचे मंत्री एकनाथ खडसे, उपसचिव भूषण गगराणी आणि सुरक्षा अधिकारी होते. संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हेलिकॉप्टर पुण्याच्या पुढे कामशेत परिसरात आल्यावर हवामान अचानक खालावले. वादळी वाऱ्याचा जोर आणि मुसळधार पावसामुळे पायलटला काहीच दिसेनासे झाले. एवढंच काय, तर नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्कही पूर्णपणे तुटल्याने गोंधळ वाढला. मुख्यमंत्री राणेंचं हेलिकॉप्टर गायब झाल्याची बातमी क्षणार्धात सरकारपर्यंत पोहोचली.

मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर तासभर गायब असल्याची बातमी कळताच मंत्रालयापासून अधिकाऱ्यांपर्यंत एकच धावपळ उडाली. 'मुख्यमंत्री बेपत्ता झाले तर?' या विचारानेच सगळ्यांच्या अंगावर शहारे आले. ताबडतोब जिल्हाधिकाऱ्यांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले. कुठल्याही क्षणी हेलिकॉप्टरला आपत्कालीन परिस्थितीत उतरवावे लागू शकते, अशी शक्यता गृहीत धरून यंत्रणा हायअलर्टवर गेली. हेलिकॉप्टरमधील मंत्री आणि अधिकारी देखील प्रचंड तणावाखाली होते.

Narayan Rane
Ladki Bahin Yojana : सरकारकडून लाडक्या बहिणींना मिळणार नाही भाऊबीजेची भेट? काय आहे कारण?

तासभर चाललेल्या या थरारानंतर हेलिकॉप्टर कसेबसे वाट काढत रायगड जिल्ह्यातील अलिबाग परिसरात पोहोचले आणि अंधारातच वैमानिकाने कौशल्याने हेलिकॉप्टर सुरक्षितरीत्या उतरवले. राणे अलिबागला पोहोचलेत, ही बातमी मिळताच सरकारपासून सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. त्यानंतर मुख्यमंत्री मुंबईकडे गाडीने रवाना झाले.

Narayan Rane
Balasaheb Thackeray Death Controversy : बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूची घोषणा करणारे डॉक्टर कोण होते?

या घाम फोडणाऱ्या प्रचंड मोठ्या अपघातातून वाचूनही नारायण राणेंनी अगदी साधी प्रतिक्रिया दिली – ''हा अपघात फार मोठा नसल्यामुळे विशेष काही वाटलं नाही.'' मोठं संकट टळूनही राणेंची ही साधी प्रतिक्रिया ऐकून उपस्थित उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com