Maval Lok Sabha Constituency : मावळमध्ये उदंड झाले अपक्ष; दोन संजोग पाटलांसह 33 उमेदवार लोकसभेच्या रिंगणात

Lok Sabha Election 2024 : या रिंगणात दोन वाघेरे आणि दोन संजोग होते. त्यातील संजय वाघेरे (नाशिक) यांचा अर्ज छाननीत बाद झाल्याने ठाकरेंचा मावळा (आघाडीचे उमेदवार) संजोग वाघेरे-पाटील यांचे निम्मे टेन्शन कमी झाले होते. पण, शिंदे शिवसेनेने उभे केलेले उरणचे दुसरे संजोग पाटील यांनी अर्ज मागे न घेतल्याने आता दोन संजोग शर्यतीत राहिले आहेत.
Sanjog Waghere-Sanjog Waghere-Patil
Sanjog Waghere-Sanjog Waghere-PatilSarkarnama
Published on
Updated on

Pimpri, 29 April : मावळ लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान होत आहे. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे आज (ता. 29 एप्रिल) 35पैकी फक्त दोन उमेदवारांनी माघार घेतली आहे. माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, 33 उमेदवार शर्यतीत असले, तरी खरी लढत ही तिरंगीच असणार आहे.

दरम्यान, 33 उमेदवारांसाठी आता इव्हीएमच्या तीन मशिन मतदानाकरिता मावळमध्ये (Maval Lok Sabha Constituency ) लागणार आहेत. मावळमध्ये 33 उमेदवारांमध्ये तब्बल 18 अपक्ष असून, तीन मुख्य व मोठ्या पक्षाचे, तर उर्वरित छोट्या पक्षांचे उमेदवार आहेत. त्यामुळे खरी लढत ही 2019 प्रमाणेच आघाडी (संजोग वाघेरे-पाटील Sanjog Waghere-Patil), महायुती (श्रीरंग बारणे Srirang Barne)आणि वंचित (माधवी जोशी) अशी पुन्हा तिरंगी होणार आहे. गतवेळी वंचितच्या राजाराम पाटील यांनी 75 हजार मते घेतली होती. या वेळीही वंचितने पुन्हा आगरी कार्ड खेळत घाटाखालील कर्जतच्या जोशी यांना उमेदवारी दिली आहे. पण, या वेळी त्यांना एमआयएमची साथ नसल्याने जोशी या पाऊण लाखापेक्षा कमी मते घेतील, असा अंदाज आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjog Waghere-Sanjog Waghere-Patil
Narendra Modi News: सोलापूरकरांचे आशीर्वाद मागण्यासाठी आलोय; पीएम मोदींनी घातली भावनिक साद

या रिंगणात दोन वाघेरे आणि दोन संजोग होते. त्यातील संजय वाघेरे (नाशिक) यांचा अर्ज छाननीत बाद झाल्याने ठाकरेंचा मावळा (आघाडीचे उमेदवार) संजोग वाघेरे-पाटील यांचे निम्मे टेन्शन कमी झाले होते. पण, शिंदे शिवसेनेने (Shivsena) उभे केलेले उरणचे दुसरे संजोग पाटील (Sanjog Waghere) यांनी अर्ज मागे न घेतल्याने आता दोन संजोग शर्यतीत राहिले आहेत. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदे शिवसेनेचा एक पदाधिकारी हजर होता.

मावळमध्ये रायगड पॅटर्न

आघाडीच्या संजोग वाघेरेंची मते खाण्यासाठी मावळमध्ये रायगड पॅटर्न राबविण्यात आला होता. पण, त्याला निम्मेच यश आले. कारण आघाडीच्या वाघेरेंच्या नावाशी साधर्म्य असलेल्या दोघांपैकी संजय वाघेरेंचा अर्ज छाननीतच बाद झाला. संजोग पाटील मात्र शर्यतीत राहिले. त्यामुळे घाटावरील पिंपरी-चिंचवडचे संजोग वाघेरे-पाटील आणि घाटाखालील उरणचे संजोग पाटील असे दोन संजोग पाटील शर्यतीत राहिले आहेत. त्यामुळे ते पिंपरीच्या आघाडीच्या पाटलांची किती मते खातात, हे 4 तारखेला कळणार आहे.

Sanjog Waghere-Sanjog Waghere-Patil
Modi on India Aghadi : इंडिया आघाडीचा पहिल्या दोन टप्प्यांतच पत्ता गूल झालाय; मोदींची गुगली

अर्ज माघारीची मुदत आज दुपारी संपली. छाननीनंतरच्या तीन दिवसांत दोन सुट्याच आल्याने या कालावधीत एकानेही माघार घेतली नव्हती. शेवटच्या दिवशी ती गोपाळ तंतरपाळे (अपक्ष) आणि भाऊसाहेब अडागळे (महाराष्ट्र मजूर पक्ष) यांनी घेतली, त्यामुळे राहिलेल्या उमेदवारांना (चिन्ह असलेले पक्ष वगळता) लगेच चिन्ह वाटप करण्यात आले.

R

Sanjog Waghere-Sanjog Waghere-Patil
Devendra Fadnavis : मोहिते पाटील फोडल्याचा फडणवीसांना एवढा राग...? मग ज्यांचे पक्ष फोडले त्यांचे काय...?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com