'त्यातील' कोणीतरी शब्द पाळला नाही : अरविंद सावंतांचा रोख कुणाकडे?

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे एकही मत फुटले नाही : खासदार अरविंद सावंत
Arvind Sawant
Arvind SawantSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : दुधानं तोंड पोळल्यावर माणूस ताकही फुंकून पितो. राज्यसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता विधान परिषद निवडणुकीसाठी विचार करून पावलं टाकली जात आहेत. आमचं एकही मत फुटलं नाही. सुहास कांदे यांचे एक मत बाद करण्यात आले. आमची ५५ मतं आहेत, त्यातील ४२ मतं ही संजय राऊत (Sanjay Raut) यांना मिळाली, तर संजय पवार यांना ३३ मतं मिळाली. या दोघांच्या मताची बेरीज ७५ होते. शिवसेनेची (shivsena) ५५ मतं आहेत, उर्वरीत २० मत आमचे सहयोगी पक्ष आणि अपक्षांकडून आली. पण त्यातील कोणीतरी दिलेला शब्द पाळला नाही, हे त्यातील सत्य आहे, असे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी सांगितले. (Not a single vote of Shiv Sena split in Rajya Sabha elections : Arvind Sawant)

खासदार अरविंद सावंत हे मुंबईत माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी राज्यसभेसोबतच विधान परिषद निवडणुकीसंदर्भातही भाष्य केले. ते म्हणाले की आम्हाला असं वाटत होतं की गरीब मावळा निवडून यावा. संजय पवार यांची कुठल्याही उमेदवारांरोबर तुलना होऊ शकत नाही. पवार हे कष्टाळू आणि निष्ठावंत शिवसैनिक आहेत. पन्नास पक्ष बदलणारे आणि निष्ठेला वाहून घेणारे यातला फरक जनतेने ओळखला पाहिजे काल कुठे होते आणि मग कुठे गेले, हे सगळं समोरच्या लोकांचा प्रवास ठाऊक आहे.

Arvind Sawant
नवनिर्वाचित खासदार महाडिकांनी महामार्गावरच घेतले राजू शेट्टींचे आशीर्वाद!

राजकारणात प्रदूषण निर्माण करणारी माणसे आहेत, त्यांनी अंतर्मुख होण्याची गरज आहे. राजकारणातील प्रदूषण नष्ट करणे गरजेचे आहे. मी ठरवलं फुटायचं नाही, विकलं जायचं नाही, मला बघून घ्यायचं नाहीये. पण, आता केंद्रातील सत्ताधारी दहशत निर्माण करतायत. प्रलोभनं निर्माण करतात. पण, आम्ही तसं कधीच करत नाही. राज्यसभा निवडणुकीत पहिल्या फेरीत आमची सगळी मतं बरोबर आहेत. आमचं गणित ठरलं होतं. पण, विकत घेणारे आहेत. तसे विकले जाणारेही आहेत, असा टोलाही अरविंद सावंत यांनी फुटीर आमदारांना लगावला.

Arvind Sawant
शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकरांच्या गाडीवर कोसळले झाड

अरविंद सावंत म्हणाले की, आदित्य ठाकरे हे अयोध्याच्या दौऱ्यावर जात आहेत. हा राजकीय दौरा नाही, सकाळी जाऊन दर्शन घेऊन ते परत येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेसुद्धा महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर अयोध्येला जाऊन आले आहेत. त्यामुळे आदित्य यांचा हा राजकीय दौरा नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com