Income Tax Raid : खासदार राऊत यांच्या निकटवर्तीयांच्या सूतगिरणीवर इन्कम टॅक्सचे छापे; ठाकरे गटात खळबळ

Thackeray Group News : सूतगिरणीच्या प्रत्येक व्यवहाराचा हिशेब ना हिशेब अत्यंत बारकाईने तपासला जात आहे.
Vinayak Raut Related News
Vinayak Raut Related NewsSarkarnama

Nagpur News : शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांमागील कटकटी काही केल्या संपायला तयार नाहीत. एकीकडे पक्षाच्या काही नेत्यांवर ईडीचे छापे पडत असताना आता नेत्यांच्या निकटवर्तीयांनाही लक्ष्य केले जात आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांचे निकटवर्तीय तुकाराम तागडे यांच्या सूतगिरणीवर आज दुसऱ्या दिवशीही छापे टाकण्यात आले आहेत. (Income Tax raids on yarn mill belonging to MP Vinayak Raut's cronies)

खासदार विनायक राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून तुकाराम तागडे यांना ओळखले जाते. त्यांची नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील मालापूर-सावरगाव येथे मातोश्री मागासवर्गीय शेतकरी सहकारी सूतगिरणी आहे. या सूतगिरणीवर प्राप्तिकर विभागाने शनिवारी सकाळी छापा टाकला होता. ती छापेमारी आज दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. सूतगिरणीच्या प्रत्येक व्यवहाराचा हिशेब ना हिशेब अत्यंत बारकाईने तपासला जात आहे.

Vinayak Raut Related News
Vasant More To Pawar : भोर-वेल्हे-मुळशी पवारांचा बालेकिल्ला कसा? तो ढासळायला वेळ लागणार नाही; वसंत मोरेंनी डागली तोफ

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला घायाळ करणारी ही कारवाई नाही ना, असा सवाल नागपूर विभागातून विचारला जात आहे. कारण तागडे हे ठाकरे गटातील सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यामुळे ठाकरे गटात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या छापेमारीमुळे बाहेरील एकाही व्यक्तीला गिरणीमध्ये सोडण्यात येत नाही. तसेच कर्मचाऱ्यांनाही घरी सोडण्यात आलेले नाही. सर्व कागदपत्रांची आणि कामगारांची चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे सूतगिरणीच्या आवारात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. दुसरीकडे ईडीचा ससेमिराही ठाकरे गटातील नेत्यांच्या मागे लावण्यात आलेला आहे. त्यामुळे चोहोबाजूंनी ठाकरे गटाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.

Vinayak Raut Related News
Killari Earthquake : ‘पवारसाहब आप पैसों की चिंता मत करो, मैं वर्ल्ड बॅंकसे बात करूंगा’; मनमोहनसिंगांनी १० दिवसांत दिले कोट्यवधी रुपये

आमदार कुणाल पाटीलही अडचणीत

ठाकरे गटाबरोबरच काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांच्या शेतकरी सहकारी सूतगिरणीवरही पुणे आणि नागरपूरच्या प्राप्तिकर विभागाकडून छापेमारी करण्यात येत आहे. कुणाल पाटील हे धुळे ग्रामीण मतदारसंघाचे आमदार असून, काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आहेत. काँग्रेसच्या प्रदेश निर्णय प्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग असतो, त्यामुळे त्यांनाही लक्ष्य करण्यात आलेले नाही ना, अशी चर्चा धुळ्यात सुरू आहे.

नागपूर आणि धुळ्यातील छाप्यातून प्राप्तिकर विभागाच्या हाती काय लागते, हे पाहावे लागेल. कारण या दोन्ही ठिकाणी शनिवारपासून छापेमारी सुरू आहे. आता यात इन्कम टॅक्स विभागाच्या हाती कोणते धागेदोरे लागतात आणि कोण अडचणीत येते किंवा प्राप्तिकर विभागाची ही छापेमारी नुसताच दिखावा आहे, हे पाहावे लागेल.

Vinayak Raut Related News
Killari Earthquake : ‘कृतज्ञता माझ्याबद्दल नको, माझी ती जबाबदारी होती...’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com