
Who is Prateek Doshi?: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मुलगी परकला वांगमयी यांचा गुरुवारी (८ जून) विवाहसोहळा पार पडला. सीतारामन यांच्या बंगळुरू येथील घरातच हा विवाहसोहळा पार पडला. या सोहळ्याचे काही फोटो समोर आले आहेत. या सोहळ्याला फक्त कुटुंबातील काही निवडक सदस्य आणि मित्र उपस्थित होते. राजकीय नेतेमंडळींना मात्र या सोहळ्याला निमंत्रित करण्यात आले नव्हते. (Who is Finance Minister Sitharaman's son-in-law 'Prateek Doshi')
अर्थमंत्री सीतारामन यांच्या मुलीचा विवाह ब्राह्मण परंपरेनुसार आणि उडुपी अदमारू मठाच्या संतांच्या आशीर्वादाने पार पडला.परकला वांगमयी यांच्या पतीचे नाव प्रतीक दोशी आहे. त्यांच्या लग्नाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही ब्राह्मण वैदिक मंत्रोच्चारांसह परकला वांगमयी आणि प्रतीक यांचे लग्न लावत आहेत. जवळच अर्थमंत्री निर्मला सीतारामन उभ्या आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, प्रतीक दोशी आणि परकला वांदमयी कोण आहेत?(Nirmala Sitaraman)
परकला वांगमयी या व्यवसायाने पत्रकार आहेत. देशातील अनेक माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम केले आहे. तर दोशी हे मूळचे गुजरातचे असून पंतप्रधान कार्यालयात विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून काम करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा ते २०१४ मध्ये दिल्लीला गेले होते. जून 2019 मध्ये त्यांना सहसचिव पदावर बढती मिळाली.
- गुजरातपासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत
दोशी हे सिंगापूर मॅनेजमेंट स्कूलचे पदवीधर आहेत. नरेंद्र मोदींच्या गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी यापूर्वी गुजरातच्या मुख्यमंत्री कार्यालयात संशोधन सहाय्यक म्हणून काम केले होते.
- दोशी हे संशोधन आणि धोरण शाखेत
पीएमओच्या वेबसाइटनुसार, प्रतिक दोशी पीएमओ"च्या रिसर्च अँड स्ट्रॅटेजी विंगमध्ये काम करतात. भारत सरकार (व्यवसाय वाटप) नियम, 1961 च्या संदर्भात पंतप्रधानांना सचिवीय सहाय्य प्रदान करणे ही त्यांची भूमिका आहे, ज्यामध्ये संशोधन आणि रणनीतीचा समावेश आहे परंतु ते मर्यादित नाही.
- पंतप्रधानांचे डोळे आणि कान
दोशी हे पंतप्रधान मोदींचे 'डोळे आणि कान' मानले जातात. ते सरकारमधील उच्च अधिकारी आणि महत्त्वाच्या लोकांवर त्यांची करडी नजर असते. ते त्यांच्या निवड आणि प्लेसमेंटवर इनपुट आणि अभिप्राय देतात.
-सोशल मीडिया नाही
प्रतीक दोशी कोणत्याही सोशल मीडियावर सक्रिय नाही.
Edited By-Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.