`भाजपला 100 जागा ज्या विश्वासावर जिंकायच्या होत्या, तेथेच दणका बसला!`

पुण्याची प्रभागरचना (PMC Election) ही राष्ट्रवादीच्या सोयीची असल्याचा भाजप आक्रमकपणे करत आहे..
Ajit Pawar-Chandrakant Patil
Ajit Pawar-Chandrakant Patilsarkarnama
Published on
Updated on

पुणे : पुणे महापालिकेची (Pune election) आगामी निवडणूक ही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विरुद्ध भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) या दोन चेहऱ्यांत होणार आहे. चंद्रकांतदादांचे लक्ष संपूर्ण राज्यावर असले तरी ते आता पुण्यातील कोथरूडचे आमदार असल्याने येथील भाजपची सत्ता राखणे त्यांच्यासाठीही आवश्यक असणार आहे. दुसरीकडे अजितदादांनी पुण्याचे पुन्हा कारभारी होण्यासाठी आधीपासूनच पावले टाकली आहेत.

या साऱ्या डावपेचांत पुण्याची प्रभागरचना हा कळीचा मुद्दा बनली होती. ती आता जाहीर झाली आहे. भाजपचे बालेकिल्ले असलेल्या विधानसभा मतदारसंघात अशा प्रकारे प्रभागरचना झाली आहे की भाजपला त्यामुळे अडचण येऊ शकते. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या सोयीनुसार ही प्रभागरचना झाल्याचा आरोप भाजपने केलाच आहे. मात्र त्यासोबत भाजपला जेथे शंभर टक्के यश मिळण्याची हमी होती, तेथेच पहिला घात झाला आहे.

Ajit Pawar-Chandrakant Patil
PMC Election : `भाजपसाठी 25 ए प्लस प्रभाग! 100 च्या खाली येणार नाही..`

पुण्यात भाजपची सत्ता येण्यात कसबा पेठ, शिवाजीनगर, कोथरूड आणि पर्वती या विधानसभा मतदारसंघांचा मोठा वाटा होता. मात्र प्रारूप प्रभाग रचनेमध्ये या विधानसभा मतदारसंघांतील नगरसेवकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. ती घट भरून काढण्यासाठी आणि महापालिकेतील सत्ता टिकवून ठेवण्यासाठी हडपसर, वडगाव शेरी आणि खडकवासला या मतदारसंघांकडे अधिक लक्ष द्यावे लागणार आहे.

Ajit Pawar-Chandrakant Patil
प्रभाग रचना जाहीर होताच भाजपच्या १६ नगरसेवकांचा राष्ट्रवादीच्या जगतापांना फोन!

महापालिका निवडणुकीसाठीची प्रारूप प्रभागरचना मंगळवारी जाहीर झाली. नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांचा समावेश करूनही ही रचना करण्यात आली आहे. त्यामुळे उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रभागांची संख्या वाढली आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघातून गेल्यावेळी महापालिकेत २८ नगरसेवक निवडणूक गेले होते. नव्या प्रभागरचनेत याच मतदारसंघात नगरसेवकांची संख्या जवळपास ३६ पर्यंत गेली आहे. वडगाव शेरी मतदारसंघातील नगरसेवकांची संख्या २४ वरून ३० पर्यंत वाढणार आहे. तर खडकवासला मतदारसंघातील संख्या मागील वेळेपेक्षा दोनने वाढणार आहे.

Ajit Pawar-Chandrakant Patil
मनसेच्या वसंत मोरेंना दाखवला कात्रजचा घाट

याउलट शहराच्या जुन्या हद्दीतील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकांची संख्या ही चोवीस वरून चौदा ते पंधरापर्यंत खाली आली आहे. शिवाजीनगर मतदारसंघातून गेल्यावेळी १२ नगरसेवक महापालिकेवर निवडून गेले होते. या वेळी या मतदारसंघातून जेमतेम दहा नगरसेवक निवडून जाणार आहेत. कोथरूड आणि पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकांच्या संख्येतही मोठी घट होणार झाली आहे. तसेच पर्वती विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकांची संख्या सहा ते सातने कमी झाली असल्याचे समोर आले आहे.

परिणामी, महापालिकेतील सत्तेचा मार्ग हा उपनगरांतून जाणार आहे. त्यामुळे भाजपला पारंपरिक मतदारांबरोबरच उपनगरांवरही अधिक लक्ष द्यावे लागणार आहे, हे स्पष्ट झाले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत हडपसर आणि वडगाव शेरी हे दोन्ही मतदारसंघ ताब्यात घेण्यास भाजपला यश आले होते. तथापि, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार निवडून आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com