Suresh Dhas : सत्ताधारी आमदार सुरेश धस यांनी निभावली विरोधी पक्षाची भूमिका; महायुतीतील नेत्यांनाही घेतले शिंगावर...

Assembly Winter Session : सत्ताधारी आमदारांनीच विरोधकांची भूमिका वठवत राज्यातील प्रमुख मुद्यांवर विधानसभेत आवाज उठवला. या अधिवशेनात आष्टी-पाटोदा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले सुरेश धस यांनी तर विरोधी पक्षाचीच भूमिका पार पाडली.
Suresh Dhas
Suresh Dhas Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 21 December : महायुती सरकारला मिळालेल्या अजस्त्र बहुमतापुढे विरोधी पक्ष किती टिकाव धरणार, अशी राजकीय धारणा होती. हिवाळी अधिवेशनात (Assembly Winter Session) ती दिसूनही आली. पण सत्ताधारी आमदारांनीच विरोधकांची भूमिका वठवत राज्यातील प्रमुख मुद्यांवर विधानसभेत आवाज उठवला. या अधिवशेनात आष्टी पाटोदा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले सुरेश धस यांनी तर विरोधी पक्षाचीच भूमिका पार पाडली. त्यांनी संतोष देशमुख खून प्रकरणाला विधानसभेत वाचा फोडली. तसेच बोगस पीकविमा प्रकरणावरून आपल्या सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. याशिवाय मराठवाड्यातील मुद्देही प्रकर्षाने मांडले.

हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच सुरेश धस (Suresh Dhas) यांनी बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणावरून सभागृहाच्या बाहेर आवाज उठवला. अधिवेनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आमदार असलेल्या धस यांनी सरकारचे अभिनंदनाचे भाषण केले. मात्र, त्यांनी संतोष देशमुख आणि बोगस पीकविमा प्रकरणाला सभागृहाबाहेर हात घातला होता, त्यातून त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली होती.

बीड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत स्वपक्षाच्या नेत्यांकडून आलेला अनुभव धस यांच्या मनात खदखद होता. त्याला संतोष देशमुख आणि बोगस पीकविमा प्रकरणं विधानसभेत मांडून वाट मोकळी करून दिली. बीड जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे, तर भाजपकडून पंकजा मुंडे यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली होती. धस यांनाही मंत्रिपदाची अपेक्षा होता. मात्र, एकाच जिल्ह्यात किती मंत्रिपदे द्यायची, हाही भाजप नेत्यांपुढे प्रश्न होता, त्यातूनच धस यांची मंत्रिपदाची संधी हुकलेली असू शकते. मात्र विधानसभेत धसांनी आग ओकली.

अधिवेनशनाच्या तिसऱ्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषावरील आभार आणि राज्य सरकारचे अभिनंदन प्रस्तावावर बोलताना धस यांनी ऊस तोडणी कामगारांना देण्यात येणाऱ्या अग्रीम रक्कम व्यवहाराला कायद्याचे संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी केली. सुरेश धस यांनी बुधवारी विधानसभेत आपला रुद्रावतार आणि हळवापणाही दाखवला.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे खून प्रकरणावर खरं तर विरोधकांनी पहिल्याच दिवशी सभागृहात आवाज उठवालयला हवा होता. मात्र, देशमुख यांच्या खूनप्रकरणाला सुरेश धस यांनी आपल्या शैलीत विधानसभेत वाचा फोडली. सुरेश धस देशमुख खून प्रकरण मांडत असताना सभागृहात ‘पिनड्रॉप सायलन्स’ होता. ज्या अमानुषणे देशमुख यांचा खून करण्यात आला, ते ऐकताना सभागृहातील उपस्थित सदस्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

Suresh Dhas
Jayant Patil : ‘तुमची कोणाचीही गरज नाही; एक मुख्यमंत्री काफी है, सांगण्यासाठीच अधिवेशन होतं’; जयंतरावांनी मोका साधलाच

या प्रकरणाच्या माध्यमातून वाल्मिक कराड याच्या माध्यमातून सुरेश धस यांनी महायुतीमधील मित्रपक्ष राष्ट्रवादी मंत्री धनंजय मुंंडे यांच्यावर निशाणा साधला. याच वेळी धस यांनी बीड जिल्ह्यातील वाढलेल्या गुन्हेगारीकडे लक्ष वेधले. बीड जिल्ह्यात तब्बल तीनशे पेक्षा जास्त पिस्तुलाचे परवाने आहेत, ते वापरणारे कोण आहेत, हेही त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बोगस पीकविमा प्रकरणावरून सुरेश धस यांनी नाव न घेता थेट धनंजय मुंडे यांच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न केला. परळी पॅटर्न म्हणत थेट अंगुलनिर्देश केला. तत्कालीन कृषिमंत्री यांच्या कार्यकाळात एकाच सीएसी केंद्रावरून परळीतील लोकांच्या नावाने परभणी, बीड, धाराशिवमध्ये काढलेल्या बोगस पीकविम्यावर कडाडून हल्ला चढवला. धस यांची प्रश्न मांडण्याची शैली पाहता तेच विरोधी बाकावर आहेत की काय, असा प्रश्न उपस्थित होत होता.

संतोष देशमुख खूनप्रकरण, बोगस पीकविमा याचबरोबर परभणीतील घटनेत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरण, सोनपेठ, गंगाखेड परिसरासह बीड जिल्ह्याच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात होणारा वाळूउपसा हेही प्रश्न प्रकर्षाने मांडले. तसेच, बीड जिल्ह्यातील जिजाऊ मल्टीस्टेट, ज्ञानराजा मल्टीस्टेट, साईराम मल्टीस्टेट, मातोश्री राजधानी मल्टीस्टेट, मराठवाडा अर्बन, माजलगाव या मल्टीस्टेट को-ऑपरेटिव बँकांनी बुडवलेल्या ठेवीदारांच्या ठेवींबाबतचा प्रश्न मांडत त्याकडे सरकारचे लक्ष वेधले.

Suresh Dhas
Assembly Session : विधानसभा दणाणून सोडली...भुसेंसह विरोधकांनी हुसकावलं; पण धसांनी शेवटपर्यंत ‘तो’ कृषिमंत्री कोण? हे सांगितलंच नाही!

एकंदरितच सत्ताधारी आमदार असूनही सुरेश धस यांनी पहिल्या अधिवेशनात राजकीय वाटचालीची चुणूक दाखवली. त्यात त्यांनी महायुतीमधील नेत्यांनाही शिंंगेवर घेतले आहे. त्याबाबत त्यांची मंत्रिपदासाठी स्पर्धाही असू शकते. मात्र, सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम सुरेश धस यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com