Satyajeet Tambe : सत्यजित तांबे यांनी सांगितले अपक्ष निवडणूक लढविण्याचे कारण...

आमच्या परिवाराला काँग्रेसमध्ये २०३० मध्ये शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत.
Satyajeet Tambe
Satyajeet TambeSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मी गेली २२ वर्षे काँग्रेस पक्षात (Congress) काम करतो आहे. आमच्या परिवाराला काँग्रेसमध्ये २०३० मध्ये शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. अशा पार्श्वभूमीवर आम्ही काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितली होती. मात्र, एबी फॉर्म न आल्याने तांत्रिक कारणामुळे माझी उमेदवारी अपक्ष झाली आहे, असे नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी स्पष्ट केले. (Satyajeet Tambe said the reason for contesting the independent election...)

नाशिक पदवीधर मतदारसंघातून डॉ. सुधीर तांबे यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव आणि युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रथमच त्यांनी अपक्ष उमेदवारीमागचे कारण स्पष्ट केले आहे.

Satyajeet Tambe
Nashik Graduate Constituency : नाशिक ‘पदवीधर’बाबत भाजपचं ठरलं : 'हा' निर्णय होणार जाहीर

सत्यजित तांबे म्हणाले की, आम्ही काँग्रेस पक्षाकडेच उमेदवारी मागितली हेाती. मात्र, एबी फार्म न आल्यामुळे मला अपक्ष उमेदवारी अर्ज भरावा लागला. योग्यवेळी आम्ही आमची राजकीय भूमिका मांडू, तेव्हा सर्व गोष्टी सांगू. सध्या आमच्याबाबत अर्धसत्य सांगितले जात आहे. जेव्हा मी सत्य मांडेन, तेव्हा आपण सर्वजण चकित होऊन जाल.

Satyajeet Tambe
Sharad Pawar : भाजप-शिंदे गटाच्या हातातून महाराष्ट्राची सत्ता जाणार : तो हवाला देत शरद पवारांचे भाकीत

दरम्यान, नगर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या बहुतांश नेत्यांनी सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्याबाबतचे संकेत दिले आहेत. आज सायंकाळी नगरमधील नेत्यांची बैठक होणार असून त्यात तांबे यांच्या पाठिंब्याबाबत भूमिका जाहीर करण्यात येणार आहे. नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे पक्षाची भूमिका मांडणार आहेत. आमदार राम शिंदे आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी स्थानिक उमेदवार म्हणून तांबे यांच्या पाठिंब्याबाबत अगोदरच सूतोवाच केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com