राणेंना पराभूत करणारे शिवसेना आमदार नाईकांची ‘ACB’कडून चौकशी; संपत्तीचा २० वर्षांचा तपशील मागविला

आमदार वैभव नाईक यांना पुढील चौकशीसाठी ता. १२ ऑक्टोबर रोजी बोलविण्यात आले आहे.
Vaibhav Naik
Vaibhav NaikSarkarnama
Published on
Updated on

कणकवली : केंद्रीय मंत्री नारायण राणेंना (Narayan Rane) पराभूत करणारे शिवसेनेचे (Shivsena) कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी, ACB) रडावर आले आहेत. रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आमदार नाईक यांची कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात अर्धा तास चौकशी केली. त्यांना २००२ पासून २०२२ पर्यंतच्या उत्पन्नाचा तपशील येत्या बुधवारपर्यंत (ता. १२ ऑक्टोबर) सादर करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, त्यांना पुढील चौकशीसाठीही बोलविण्यात आले आहे, त्यामुळे शिवसेना आमदारांच्या पाठीमागे चौकशीचा ससेमिरा लागणार, अशी जी चर्चा सुरू होती, त्याला नाईक यांच्यापासून सुरुवात झाल्याचे मानले जात आहे. (Shiv Sena MLA Vaibhav Naik interrogated by ACB)

यासंदर्भात आमदार वैभव नाईक म्हणाले की, मला रत्नागिरी अँटी करप्शन ब्यूरोची चौकशीची नोटीस आली आहे. अँटी करप्शन ब्यूरोला सर्व माहिती देण्यात येईल. मात्र, अशा प्रकारच्या नोटिसी पाठवून आमच्यावर कोणी दबाव आणू पाहत असेल, तर त्या दबावाला भीक घालणार नाही, असे खुले आव्हान नाईक यांनी दिले आहे.

Vaibhav Naik
दसरा मेळाव्यासाठी केलेल्या खर्चाचा स्त्रोत काय? मुख्यमंत्री शिंदेंविरोधात हायकोर्टात याचिका दाखल

राजकीय फायदा घेऊन आमदार नाईक यांनी अवैध संपत्ती गोळा केली आहे, अशी तक्रार राज्‍याच्या पोलिस महासंचालकांकडे अज्ञाताकडून करण्यात आली होती. ही तक्रार पोलिस महासंचालक कार्यालयाकडून ठाणे पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे वर्ग करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास ठाणे पोलिसांकडून रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देण्यात आला होता.

Vaibhav Naik
नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांच्या उमेदवारीची घोषणा

रत्‍नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुशांत चव्हाण यांनी आमदार नाईक यांची अर्धा तास चौकशी केली. कणकवलीचे उपनगराध्यक्ष म्हणून नाईक यांची राजकीय इनिंग सुरू झाली हेाती. त्यानंतर कुडाळचे आमदार म्हणून निवडून आले. एसीबीकडून आमदार नाईक यांच्याकडे उपनगराध्यक्ष झाल्यापासून म्हणजेच २००२ पासून आजपर्यंतच्या संपत्तीचा चौकशीचे विवरण येत्या १२ तारखेपर्यंत देण्यास एसीबीकडून त्यांना सांगण्यात आले आहे. यामध्ये त्‍यांची वडिलोपार्जित संपत्ती, त्‍यानंतर राजकीय क्षेत्रात आल्‍यानंतर त्‍यांनी किती संपत्ती जमविली याची चौकशी एसीबीकडून करण्यात येणार आहे. त्याचा अहवाल राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे देण्यात येणार आहे, असे पथकाकडून सांगण्यात आले.

Vaibhav Naik
उद्धवजी, ‘ते’ शब्द परत घ्या : देवेंद्र फडणवीसांचे ठाकरेंना आवाहन

दरम्यान, एसीबीच्या चौकशीसंदर्भात आमदार वैभव नाईक म्हणाले की, मला रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशीसाठी नोटीस आली आहे. मी चौकशीला सामोरे जाणार आहे. एसीबीकडून जी माहिती मागितली आहे, ती सर्व माहिती मी त्यांना देणार आहे. पण, आमच्यावर अशा प्रकारच्या नोटिसा पाठवून कोणी दबाव आणणार असेल तर आम्ही अशा दबावाला भीक घालणार नाही. आमची संपत्ती ही वडिलोपार्जित आहे. आमचे स्वकमाईचे उद्योगधंदे आहेत, त्यातून आम्हाला उत्पन्न मिळते. त्या संपत्तीचा तपशील एसीबीला देण्यात येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com