Shivraj Patil Chakurkar: शेवटच्या क्षणापर्यंत घनिष्ठ मैत्री जपलेले लातूरच्या मातीतील दोन खंबीर नेते

Shivraj Patil Chakurkar And Shivajirao Nilangekar News: माजी केंद्रीय गृहमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांचे आज सकाळी लातूर येथे निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. तब्बल सातवेळा ते लातूरचे खासदार राहिले आहेत. वाढत्या वयामुळे मागील काही काळापासून ते आजारी होते. घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी साडेसहा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Shivraj Patil Chakurkar And Shivajirao Nilangekar.jpg
Shivraj Patil Chakurkar And Shivajirao Nilangekar.jpgSarkarnama
Published on
Updated on

Latur Politics : माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर आणि माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर ही राजकारणातील दोन व्यक्तिमत्त्वे शेवटच्या क्षणापर्यंत घनिष्ठ मैत्री जपत राहिले. निवडणूक असो वा कौटुंबिक कार्यक्रम निलंगेकरांच्या कोणत्याही सोहळ्याला चाकूरकर कुटुंबाची उपस्थिती असायचीच. निलंगेकर नेहमी सांगत, तुम्ही देशपातळीवर नेतृत्व करा, मी महाराष्ट्रात आमदार म्हणून लातूर जिल्हा आणि कर्नाटक सीमाभागाची जबाबदारी सांभाळतो.

दोघांच्या राजकीय भूमिकांपेक्षा घट्ट मैत्री नेहमीच मोठी ठरली. दोघेही काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते, गांधी घराण्यावरील त्यांची अढळ निष्ठाही समान. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत निलंगेकरांची सून रूपा पाटील निलंगेकर यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली व त्यांनी शिवराज पाटील चाकूरकरांचा (Shivraj Patil Chakurkar) पराभव केला. तरीही या दोन घराण्यांमध्ये कटुता कधीच निर्माण झाली नाही.

उलट, दिल्लीतील विविध ठिकाणी रूपा पाटील निलंगेकर यांना मानसन्मान मिळवून देण्यात चाकूरकरांनी स्वतः पुढाकार घेतला. एवढेच नाही, तर सोनिया गांधी यांच्यासोबतही रुपाताई निलंगेकरांची ओळख चाकूरकरांनीच करून दिली. त्या काळात पराभवानंतर कटुता वाढणे ही राजकारणातील सामान्य पद्धत होती. परंतु निलंगेकर-चाकूरकरांनी राजकारण राजकारणाच्या पातळीवर ठेवून कौटुंबिक नातेसंबंध जपले.

Shivraj Patil Chakurkar And Shivajirao Nilangekar.jpg
Uddhav Thackeray: विरोधी पक्षनेतेपदासाठी टाळाटाळ, ठाकरेंनी नार्वेकर,शिंदेंनाच गाठलं; भाजपला करुन दिली केजरीवालांच्या 'मोठेपणा'ची आठवण

लोकसभा निवडणुकीत शिवाजीराव निलंगेकर (Shivajirao Nilangekar) गावागावांत जाऊन चाकूरकरांचा प्रचार करत असत. तर विधानसभेला चाकूरकर निलंगेकरांना निवडून आणण्यासाठी तेवढ्याच उत्साहाने सहभाग घेत. एकाच पक्षातील असूनही पारदर्शक, विश्वासू आणि मनःपूर्वक मैत्री कशी जपावी याचे आदर्श उदाहरण या दोन नेत्यांनी उभे केले आणि मैत्रीचा नवा पॅटर्नच लातूर जिल्ह्याच्या राजकारणात निर्माण केला.

Shivraj Patil Chakurkar And Shivajirao Nilangekar.jpg
Santosh Deshmukh: संतोष देशमुखांच्या हत्येवेळी वाल्मिक कराड शेकडो किलोमीटर दूर! जामीन मिळणार का? वकिलांनी काय केला युक्तीवाद?

माजी केंद्रीय गृहमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांचे आज सकाळी लातूर येथे निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. तब्बल सातवेळा ते लातूरचे खासदार राहिले आहेत. वाढत्या वयामुळे मागील काही काळापासून ते आजारी होते. घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी साडेसहा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com