Jayant Patil : सासऱ्यांच्या सल्ल्यानेच नार्वेकरांना अध्यक्ष केलंय; जयंतरावांच्या खुमासदार भाषणाला फडणवीसांची फोडणी!

Maharashtra Assembly Session : मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्र्यांची भाषणं झाली. पण, पहिल्या भाषणपेक्षा (फडणवीस) दुसरं भाषणच (शिंदे) मुख्यमंत्र्यांचं आहे की काय असं वाटायचं आमच्यावर पाळी आली. त्यामुळे सभागृहाला प्रदीर्घ मार्गदर्शन झाले. (शिंदेंच्या लांबलेल्या भाषणावर जयंत पाटलांची कोटी)
Jayant Patil-Rahul Narwekar-Ramraje Naik Nimbalkar-Devendra Fadnavis
Jayant Patil-Rahul Narwekar-Ramraje Naik Nimbalkar-Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 09 December : ॲड. राहुल नार्वेकरांना मी नेहमी सल्ला द्यायचो की, तुम्ही मंत्री झालेले जास्त चांगलं होईल. पण, तो भाजपचा निर्णय आहे, मला त्या खोलात जायचं नाही. (तेवढ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सासरे (रामराजे नाईक निंबाळकर) म्हणतात की त्यांनाच अध्यक्ष करा,’ अशी टिपण्णी केली) त्याला जयंतरावांनी हजरजबाबीने ‘सासऱ्यांचं तुम्ही किती ऐकता, हे मला अलीकडच्या काळात चांगलं कळायला लागलंय,’ असे उत्तर दिले. सासऱ्यांच्या आग्रहानुसार अध्यक्ष केले, असे मी म्हणणे म्हणजे नार्वेकरांच्या कर्तबगारीवर अन्याय करणारे आहे. त्यांनी हे पद स्वतःच्या कर्तबगारीवर मिळविले आहे, अशा खास शैलीत जयंतरावांंनी विधानसभेत चिमटे काढले.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या (Rahul Narwekar) अभिनंदन ठरावाच्या भाषणांमध्ये जयंत पाटील यांचे भाषण खुमासदार, खुसखुशीत आणि चिमटे काढणारे ठरले. ते म्हणाले, मागील अडीच वर्षांत आपण दोन्ही बाजूला न्याय देण्याचे काम केले आहे. संख्याबळावर तुम्ही फारसं बोट ठेवलं नाही. तोच स्वभाव तुमचा याहीवेळी कायम राहील, अशी अपेक्षा करतो.

मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्र्यांची भाषणं झाली. पण, पहिल्या भाषणपेक्षा (फडणवीस) दुसरं भाषणच (शिंदे) मुख्यमंत्र्यांचं आहे की काय असं वाटायचं आमच्यावर पाळी आली. त्यामुळे सभागृहाला प्रदीर्घ मार्गदर्शन झाले. (शिंदेंच्या लांबलेल्या भाषणावर जयंत पाटलांची कोटी)

दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर तुम्ही पुन्हा विधानसभेचे अध्यक्ष झालात. पण, मी तुम्हाला खासगीत नेहमी सांगायचो की, परत संधी मिळाली तर आपण मंत्री व्हा. मी त्यांना नेहमी सल्ला द्यायचो की तुम्ही मंत्री झाले तर जास्त चांगलं होईल. पण आपल्या पक्षाचा तो निर्णय मला त्याच्या खोलात जायचं नाही. (तेवढ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ‘सासरे (रामराजे नाईक निंबाळकर) म्हणतात की त्यांना अध्यक्षच करा,’ अशी टिपण्णी केली) त्याला जयंतरावांनी हजरजबाबीने ‘सासऱ्यांचं तुम्ही किती ऐकता, हे मला अलीकडच्या काळात चांगला कळायला लागलं आहे,’ असे उत्तर दिले.

Jayant Patil-Rahul Narwekar-Ramraje Naik Nimbalkar-Devendra Fadnavis
Ajit Pawar : आपला करेक्ट कार्यक्रम झालाय, हे लक्षात घ्या... तेव्हा कसं गारगार वाटायचं; अजितदादांची जोरदार टोलेबाजी

विधानभवनातील दालनं तुम्ही खरंच सुरेखच केली आहेत. पण, आपल्याकडे वाद घालण्यासाठी येणाऱ्यांना आपण गरम कॉफी देऊन शांत करून बाहेर घालवले, याचा आम्ही गेल्या अडीच वर्षांत अनुभव घेतला आहे. (फडणवीसांनी त्यात भर टाकत ‘मासे खाऊ घालून’ असा उल्लेख केला) मासेपण खाऊ घातले, पाहिजे तर जेवणही दिले, असे जयंतराव म्हणाले.

बिझनेस ॲडव्हायझरी कमिटीच्या बैठकीचा दर्जा एवढा उंच गेला की आपणच विधानसभेचे अध्यक्षपदी राहावे, असे आम्हाला मनोमन वाटत होते, असे जयंत पाटील म्हणाले, त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ‘आधी सांगितलं असतं तर वेगळा मेन्यू ठेवला असता’ अशी कोटी केली. त्यालाही जयंतरावांनी हसून दाद देत ‘आपली विधानसभाच्या अध्यक्षपदी काम करायची इच्छा नाही, हे आम्हाला माहिती आहे. पण पक्षाने आपल्याला आदेश दिल्याने आपण अध्यक्ष झाला आहात,’ असे विधान केले.

Jayant Patil-Rahul Narwekar-Ramraje Naik Nimbalkar-Devendra Fadnavis
Indapur News : इंदापुरात डीजेच्या दणदणाटात ‘ईव्हीएम’ची घोड्यावरून काढली मिरवणूक

जयंत पाटील म्हणाले, एक मान्य केलं पाहिजे की सभागृहाच्या दालनाचीच नाही, तर सगळीच व्यवस्था अतिशय उत्तम पद्धतीने करण्याचे काम आपल्या अडीच वर्षांच्या काळात झाले आहे. मी केलेल्या काही सूचानांची अंमलबजावणी आपल्याकडून होईल, याची अपेक्षा मला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com