Lok Sabha Election 2024 : शिंदेंचे 'शिवदूत' निवडणुकीत फडकवणार का विजयी पताका?

Thane loksabha Election : राजकीय माहोल तयार होत असतानाच लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाने आवाजासह शांततेत ‘क्रांती’ घडवण्याची रणनीती अवलंबली आहे.
Shivsena
Shivsena Sarkarnama
Published on
Updated on

Shivsena Thane Lok Sabha : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सर्वत्र सुरू आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष मैदानात उतरले आहेत. देशभरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारांची घोषणा, अर्ज दाखल करण्याची धावपळ, बंडखोरी, प्रचार सभा, नाराजीनाट्य, भेटीगाठी, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अशा सर्व घडामोडींमुळे सुरू आहे. त्यामुळे देशात निवडणुकीपूर्वी वातावरण चांगले तापले आहे. राजकीय माहोल तयार होत असतानाच लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाने आवाजासह शांततेत ‘क्रांती’ घडवण्याची रणनीती अवलंबली आहे. Lok sabha Election 2024 election campaign strategies

"अरे आवाज कुणाचा..."असे म्हणत रस्त्यावरचा प्रचार हीच आतापर्यंत शिवसेनेची खासियत होती; पण शिवसेनेने Shivsena लोकसभा निवडणुकीच्या lok Sabha Election पार्श्वभूमीवर मतदारसंघांमध्ये 10 ते 20 हजार शिवदूतांची फळी उभारली आहे. प्रत्येक शिवदूतावर 25 घरांची जबाबदारी देण्यात आली आहे. नेमून दिलेल्या घरातील मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्याची जबाबदारी या शिवदूतांना देण्यात आली आहे. केवळ विजय मिळवणे हा उद्देश न ठेवता मतदारांच्या पसंतीसही आम्ही उतरलो आहे, हे दाखवण्यासाठी मतदानाचा टक्का वाढवणे, हेही यातून सिद्ध करण्याचा प्रयत्न शिंदे गटाचा आहे. Eknath Shinde also starts election prepration.

काही ठिकाणच्या जागावाटपावरून महाविकास आघाडी MVA आणि महायुतीत मतभेद आहेत. पण या घडामोडीत शिवसेना शिंदे गटाने ‘डॅमेज कंट्रोल’ची मोहीमही हाती घेतली आहे. शिवसेनेत बंड केल्यानंतर मिळालेल्या जागेवरील उमेदवार निवडून आणणे, यासाठी कसब या निवडणुकीत लागणार आहे. इतकेच नव्हे, तर लोकसभेच्या निवडणुकीनंतरच LokSabha Election येऊ घातलेल्या विधानसभेचे गणित अवलंबून असणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारांच्या घरापर्यंत दस्तक देण्याची व्यूहरचना शिंदे गटाने Shivsena आखली आहे. त्यासाठी शिवदूतांची मोठी मदत मिळणार आहे.

Shivsena
Madha Lok Sabha 2024 : फडणवीस, पवारांना भेटलेले जानकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार की स्वतंत्र अस्तित्व ठेवणार?

काय आहे 'शिवदूत' संकल्पना?

'शिवदूत' ही संकल्पना शिवसेना शिंदे गटाने ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमासाठी राबवली होती. या शिवदूतांनी हजारो लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत शासकीय मदत पोहाेचवली. त्यामुळे त्यांची एक स्वच्छ प्रतिमा तयार झाली. याचाच उपयोग लोकसभा निवडणूक आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या विविध उपक्रम, सभा, प्रचारासाठी करण्याची शिंदे गटाची रणनीती आहे. ठाणे लोकसभेत 10 ते 15 हजारांच्या आसपास तर कल्याण लोकसभेत तब्बल 20 हजार शिवदूत कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे; तर राज्यात ज्या ज्या ठिकाणी शिंदे सेनेचे उमेदवार असतील, त्या त्या ठिकाणी हे शिवदूत काम करणार आहेत. What is Shivdut concept?

शिवदूत असे करतील काम

मतदार याद्या अपडेट करणे, प्रत्येक मतदारांपर्यंत प्रत्यक्ष पोहाेचण्याची मुख्य जबाबदारी या शिवदूतांवर सोपवण्यात आली आहे. हे काम चोख व्हावे, यासाठी एका शिवदूताला 25 घरांचीच जबाबदारी दिल्याचे समजते. रोजच्या रोज बैठका घेणे, स्लीपचे वाटप करणे, वचननामा, जाहीरनामा मतदारापर्यंत पोहाेचवण्याचे काम शिवदूत पार पाडणार आहे.

याशिवाय मतदानापर्यंत किमान चार वेळा प्रत्येक घरी जाऊन त्यांच्या गाठीभेटी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. इतकेच नव्हे, तर या मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्याची जबाबदारीही या शिवदूतांच्या खांद्यावर आहे. मतदारांशी सुसंवाद साधणार. केवळ निवडणुकीसाठी हा फंडा आहे, हे मतदारांना वाटू नये, यासाठी सुसंवादावर भर देण्यात आला आहे. प्रत्येक घराचा डाटा या शिवदूतांकडे आहे. त्यानुसार वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवण्यापासून ते काही अडचण असल्यास त्याचे निवारणही हे शिवदूत करत आहेत.

R

Shivsena
Narendra Modi News : पंतप्रधानांच्या सभेची तारीख ठरली; 29 एप्रिलला पुण्यात होणार सभा !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com