Solapur News : भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या महायुतीतील तीन पक्षांचा एकत्रित महामेळावा घेण्याची सूचना वरिष्ठांनी केली आहे. त्यानुसार महायुतीचे उद्या (ता. १४ जानेवारी) राज्यभर महामेळावे होणार आहेत. या मेळाव्यात प्रमुख म्हणून मंत्र्यांसह राज्यातील प्रमुख नेत्यांवर जिल्हानिहाय जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्यावर नांदेड जिल्ह्यातील महायुतीच्या मेळाव्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे पाटील हे मंत्र्यांच्या पंक्तीत आले आहेत. (Umesh Patil will be in charge of Nanded Mahayuti Melava)
महायुतीमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप यांच्यासह मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांचे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोमिलन होणे गरजचे आहे. त्यांच्यामध्ये एकोपा निर्माण व्हावा, यासाठी उद्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांत महायुतीचे महामेळावे होणार आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सोलापूरच्या मेळाव्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उमेश पाटील यांच्यावर नांदेड जिल्ह्याच्या महायुती मेळाव्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे उमेश पाटलांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि पर्यायाने राज्यातील महायुती सरकारमधील वजन अधोरेखित होते.
नांदेड जिल्ह्याची ओळख ही माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा बालेकिल्ला म्हणून महाराष्ट्रात आहे. आता नेमके राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुती सरकारने उमेश पाटील यांच्याकडे नांदेड जिल्हा सोपवला आहे. उमेश पाटील हे आक्रमक व प्रभावी भाषणासाठी परिचित आहेत.
उमेश पाटील हे नांदेडच्या मेळाव्यात महायुतीची बाजू कशी मांडतात. तसेच, एकेकाळचे सहकारी असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा, महाविकास आघाडीतील नेत्यांचा कोणत्या शब्दांत समाचार घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.