Vidhansabha Election1980 Flashback : पुलोद सरकार बरखास्त, मध्यावधी अन् इंदिरा काँग्रेस सत्तेत!

Maharashtra Politics History : 1980 च्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसनं बहुमताच्या जोरावर सत्ता मिळवली. आणीबाणीनंतरच्या कठीण परिस्थितीतही इंदिरा गांधींच्या बाजूनं उभे राहिलेल्या अब्दुल रहमान अंतुले अर्थात ए. आर. अंतुले हे 9 जून 1980 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले.
Indira gandhi.jpg
Indira gandhi.jpgSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra News : 1980 च्या विधानसभा निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे इंदिरा गांधींची पुन्हा एकदा जादू पाहायला मिळालेली! 1979 मध्ये इंदिरा गांधी केंद्रात सत्तेत येताच त्यांनी महाराष्ट्रातलं पुलोद सरकार बरखास्त केलं. राष्ट्रपती राजवटीनंतर 1980 मध्ये महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागल्या आणि इंदिरा काँग्रेसला बहुमत मिळालं. नेमकं काय घडलं होतं या निवडणुकीत?

जनता पक्ष विरुद्ध इंदिरा काँग्रेस विरुद्ध रेड्डी काँग्रेस अशी मुख्य लढत 1980 च्या निवडणुकीत पाहायला मिळाली. इंदिरा काँग्रेसनं 286 रेड्डी काँग्रेसनं 192 तर जनता पक्षानं 111 जागा लढवल्या. पक्ष स्थापनेनंतर पहिल्यांदाच निवडणूक लढवलेल्या भाजपनं 145 जागा लढवल्या तर शिवसेनेनं ही निवडणूक लढवलीच नाही. 13 पक्ष आणि 612 अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले आणि सुरू झाला विधानसभा निवडणूक 1980 चा रणसंग्राम...

जनता पक्ष 99 वरून 17 वर, इंदिरा काँग्रेस सत्तेवर!

1978 मध्ये सर्वाधिक म्हणजे 99 जागा जिंकणाऱ्या जनता पक्षाला या निवडणुकीत अवघ्या 17 जागा जिंकता आल्या तर इंदिरा काँग्रेससमोर आव्हान उभं केलेल्या रेड्डी काँग्रेसला 47 जागांवर विजय मिळवता आला. 1978 मध्ये 62 जागा जिंकता आलेल्या इंदिरा काँग्रेसनं या निवडणुकीत मात्र तब्बल 186 जागा मिळवून बहुमताचा आकडा पार केला.

भाजपच्या हाती अवघ्या 14 जागा लागल्या. 13 पैकी 08 पक्षांना जागा जिंकता आल्या तर उर्वरित 05 पक्षांच्या हाती भोपळा लागला. 612 पैकी 10 अपक्ष आमदार निवडून आले ज्यात कुर्ल्यातून निवडून आलेले कामगार संघटनेचे नेते दत्ता सामंत तसेच माळशिरसमधून निवडून आलेले विजयसिंह मोहिते-पाटील यांचा समावेश होता.

Indira gandhi.jpg
Raj Thackeray : ठाकरे गटाने सुपारी फेकल्यानंतर राज ठाकरे पोलिसांवर भडकले; म्हणाले...

1978 च्या तुलनेत अपक्ष आमदारांची संख्या घटून ती 28 वरून 10 वर आली. भाजपचे पहिल्याच निवडणुकीत 14 आमदार निवडून आले. 1978 च्या तुलनेत इंदिरा काँग्रेसच्या 124 जागा वाढल्या. भाकपची देखील 01 जागा वाढली. तिकडं जनता पक्ष आणि रेड्डी काँग्रेसला मात्र फटका बसला. जनता पक्षाच्या 82 जागा घटल्या.

इतर काही पक्षांनी जिंकलेल्या, लढवलेल्या जागा

शेकाप - विजयी - 09 - लढवलेल्या जागा - 41

माकप - विजयी - 02 - लढवलेल्या जागा - 10

भाकप - विजयी - विजयी - 02 - लढवलेल्या जागा - 17

रिपाइं (खोब्रागडे) - विजयी - 01 - लढवलेल्या जागा - 42

बॅ. अंतुले महाराष्ट्राचे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री!

1980 च्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसनं बहुमताच्या जोरावर सत्ता मिळवली. आणीबाणीनंतरच्या कठीण परिस्थितीतही इंदिरा गांधींच्या बाजूनं उभे राहिलेल्या अब्दुल रहमान अंतुले अर्थात ए. आर. अंतुले हे 9 जून 1980 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. विशेष म्हणजे जेव्हा त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली तेव्हा ते कोणत्याही सभागृहाचे (विधानसभा किंवा विधान परिषद) सदस्य नव्हते. पुढं 23 नोव्हेंबर 1980 रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत अंतुले विजयी होऊन आणि विधानसभेचे सदस्य झाले. अशाप्रकारे बॅरिस्टर अंतुले महाराष्ट्राचे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री ठरले.

पुढं 23 नोव्हेंबर 1980 रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत अंतुले विजयी होऊन आणि विधानसभेचे सदस्य झाले. अशाप्रकारे बॅरिस्टर अंतुले महाराष्ट्राचे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री ठरले. पुढं सिमेंट परवानाप्रकरणी त्यांच्या 'इंदिरा गांधी प्रतिष्ठान'ला दिलेल्या निधीचा मुद्दा संसदेत गाजला आणि पंतप्रधान इंदिरा गांधींच्या नावाचा वापर झाल्यानं अंतुलेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. हा खटला तब्बल 16 वर्षे चालला. अखेर अंतुले या प्रकरणातून निर्दोष सुटले मात्र त्यांचे मुख्यमंत्रिपद गेले

Indira gandhi.jpg
Video Shivendraraje Bhosale : मराठा आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीसांच्या मागे उभे राहा, शिवेंद्रराजे भोसले यांचे मराठा बांधवांना आवाहन

9 जून 1980 ते 20 जानेवारी 1982 पर्यंत अंतुले महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी होते. अंतुलेंनंतर 21 जानेवारी 1982 रोजी बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले मात्र त्यांचं विनोदी वर्तन, साध्या साध्या निर्णयासाठी दिल्ली गाठणं यामुळं ते टीकेचा विषय ठरले.

अखेर पक्षाचं आणखी हसू होऊ नये म्हणून इंदिरा गांधींनीच बाबासाहेब भोसले यांना मुख्यमंत्रिपदावरून काढलं. बाबासाहेब भोसले अवघे 13 महिने मुख्यमंत्रिपदावर राहिले. त्यानंतर वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. 2 फेब्रुवारी 1983 ते 9 मार्च 1985 असा त्यांचा कार्यकाळ राहिला.

एकूणच काय तर 1980 च्या निवडणुकीत इंदिरा गांधींचा करिष्मा चालला आणि त्यांचा पक्ष इंदिरा काँग्रेस बहुमतानं सत्तेत आला पण 1980 ते 1985 या पाच वर्षांच्या कार्यकाळात इंदिरा गांधींनी तीन जणांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसवलं.

पुढील भागात विधानसभा फ्लॅशबॅक 1978

Indira gandhi.jpg
Sushma Andhare Vs Devendra Fadnavis: महाराष्ट्राच्या राजकारणातून भाजपच फडणवीसांना बाहेर करणार; अंधारेंचं मोठं विधान

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com