एकनाथ शिंदेंनी नव्हे; तर काँग्रेसने ‘तो’ प्रस्ताव दिला होता : अशोक चव्हाणांना सत्तारांचे उत्तर

मी त्यावेळी काँग्रेस पक्षात होतो. काँग्रेसने शिवसेनेला आपण एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता.
Eknath Shinde-Abdul Sattar-Ashok Chavan
Eknath Shinde-Abdul Sattar-Ashok ChavanSarkarnama
Published on
Updated on

जालना : मी त्यावेळी काँग्रेस (Congress) पक्षात होतो. काँग्रेसने शिवसेनेला (Shivsena) आपण एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता. अर्जून खोतकर त्यावेळी शिवसेनेचे आमदार होते. आम्ही ज्यावेळी हा प्रस्ताव दिला होता, त्यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे विरोधी पक्षनेते होते. शिंदे विरोधी पक्षनेते असताना काँग्रेस पक्षाने त्यांना विनंती केली होती की, आपण एकत्र येऊन आपले सरकार बनवू, असा खुलासा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या आरोपावर कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केला आहे. (Not by Eknath Shinde; Congress had proposed 'that': Sattar's reply to Ashok Chavan)

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ‘भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून आला होता. एकनाथ शिंदे यांचा त्या शिष्टमंडळात समावेश होता,’ असा गौप्यस्फोट दोन दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. त्यात सत्तार यांनी उडी घेत शिंदे यांची बाजू लढवली आहे.

Eknath Shinde-Abdul Sattar-Ashok Chavan
भाजपने बारामतीतील राष्ट्रवादीचा महत्वाचा मोहरा लावला गळाला

औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या ‘एकनाथ शिंदे हे १५ ते १६ आमदार घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते,’ या आरोपाला उत्तर देताना कृषीमंत्री सत्तार म्हणाले की, ज्याला गणित कळत नाही, पुढचं कळत नाही. ते असं बोलतात. आमच्याकडे (काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे) १०० लोक होते आणि एकनाथ शिंदे हे पंधरा आमदार घेऊन आले असते तर सरकार बनलं असतं का? त्यांचा अभ्यास नाही, असा टोलाही त्यांनी खैरे यांना लगावला.

Eknath Shinde-Abdul Sattar-Ashok Chavan
उद्धवसाहेब, राष्ट्रवादीच्या अत्याचाराची दखल तुम्ही घ्यायला हवी होती : आढळरावांचे ठाकरेंना उत्तर

लोकशाहीत संख्याबळाला महत्व आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे शंभरही आमदार नव्हते. मग, हे पंधरा आमदार घेऊन सरकार बनू शकलं असतं का. किती वेड्यासारखं आरोप करतात. मला किव येते या राजकारण्यांची. मी काही मोठा नेता नाही. सामान्य कार्यकर्ता आहे. पण, त्यावेळी १५ नव्हे तर २५ आमदारही घेऊन आले असते तरी सरकार बनलं नसतं. मला त्यावेळची परिस्थिती चांगली आठवते. आम्ही शिवसेनेला विनंती केली हेाती की, आपण एकत्र येऊन सरकार बनवू. पण त्यावेळी एकनाथ शिंदे आणि त्यांचे त्यावेळच्या नेत्यांनी मान्य केले नाही. पण, एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसला असा कोणताही प्रस्ताव दिलेला नव्हता, असे स्पष्टीकरण सत्तार यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com