भाजपचे शंभरपेक्षा जास्त आमदार का निवडून येणार? विश्वंभर चौधरींनी सांगितले कारण...

आज जर निवडणुका झाल्यास परिस्थिती काय असेल? याचा कल सकाळ-सामने केलेल्या 'मूड महाराष्ट्राचा' सर्वेक्षणातून जाणून घेतला आहे.
Mood of Maharashtra
Mood of MaharashtraSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : भाजपची (BJP) स्पेस कुठे असेल तर महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीनही पक्षांकडून तिकिट न मिळालेले नाराज यांच्यावर त्यांची मोठी भिस्त असेल. दुसरी गोष्टी म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात संघर्ष सुरु असणाऱ्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे, असे विश्लेषण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांनी केले. (Why more than 100 BJP seats will be elected? dr. Vishwambhar Chaudhary said because...)

महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) सत्तेत येऊन दोन वर्षे झाली आहेत. आज जर निवडणुका झाल्यास परिस्थिती काय असेल? याचा कल सकाळ-सामने केलेल्या 'मूड महाराष्ट्राचा' सर्वेक्षणातून जाणून घेतला आहे. त्या कार्यक्रमात डॉ. चौधरी बोलत होते.

Mood of Maharashtra
शिवसेना-भाजपने एकत्र यावे का?... राज्यातील जनता म्हणते...

डॉ. चौधरी म्हणाले की, राज्यात कॉंग्रेस फॅक्टर म्हणून वाढताना दिसत आहे. सर्व्हेतील आकडेवारी पाहिली की, काही ठिकाणी कमी वाटते आहे. कित्येक ठिकाणी प्रादेशिक पक्षांमधील संघर्ष आहे. लोकांच्या भावना या वेळी महत्वाची भूमिका बजावताना दिसणार आहे.

Mood of Maharashtra
काँग्रेस २०२४ मध्ये मुख्यमंत्रिपदावर दावा करणार का..? सत्यजित तांबे म्हणाले...

वेगवेगळ्या पक्षांची विचारधारा आणि प्रचार करण्याची पद्धती संपलेली नाही. सध्या राज्यात काय चालू आहे? माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह प्रकरणाचा परिणाम त्या त्या पक्षावर झाला आहे. विचारधारेचा मुद्दा संपला आहे. सेक्युलर मताचा टक्का १ इतका आहे. मोदींच्याबाबत सांगायचे झाल्यास, त्यांनी जसे आपल्याला सगळे त्रास देतात, असे चित्र निर्माण केले होते, असेही विश्वंभर चौधरी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com