Rahul Gandhi News : राहुल गांधींचा लातूर मुक्काम मराठवाड्यात काँग्रेसला 'अच्छे दिन' आणणार?

Political News : राहुल गांधी यांनी मराठवाड्यातील लातूर, नांदेड, जालना या काँग्रेस लढत असलेल्या तीन जागांसह इतर पाच जागांचा आढावा घेतला. या वेळी त्यांनी चर्चा करीत मराठवाड्यातील आठ मतदारसंघांतील महाविकास आघाडीच्या प्रचाराबाबत रणनीती ठरवली असल्याची माहिती पुढे येत आहे.
Rahul Gandhi, dheeraj deshmukh, Amit deshmukh
Rahul Gandhi, dheeraj deshmukh, Amit deshmukh Sarkarnama

latur News : लातूर मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आतापर्यंत झालेल्या 15 निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने 11 वेळा विजय मिळवला आहे, तर भाजपने येथे तीनदा विजय मिळवला. सध्या भाजपचे सुधाकर श्रृंगारे हे खासदार आहेत. भाजपने त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसने कंबर कसली असून, काँग्रेस पक्षाचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी बुधवारी रात्री लातूर येथील हॉटेल ग्रँड सरोवर येथे मुक्काम केला.

लातूर येथील त्यांचा हा मुक्काम काँग्रेस जणांसाठी ऊर्जा देणारा ठरला आहे. या निमित्ताने राहुल गांधी यांनी मराठवाड्यातील लातूर, नांदेड, जालना या काँग्रेस लढत असलेल्या तीन जागांसह इतर पाच जागांचा आढावा घेतला. या वेळी त्यांनी चर्चा करीत मराठवाड्यातील आठ मतदारसंघांतील महाविकास आघाडीच्या प्रचाराबाबत रणनीती ठरवली असल्याची माहिती पुढे येत आहे.

लातूर येथील विमानतळावर रात्रीच्या वेळी विमान अथवा हेलिकाॕप्टर उतरणे व उड्डाण घेण्याच्या अत्याधुनिक सुविधा नसल्यामुळे काँग्रेसचे (congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) अचानकपणे लातूर येथे बुधवारी रात्री मुक्कामी थांबले असून, ते बिदर (कर्नाटक ) अथवा हैदराबाद येथून ते दिल्लीला जाणार होते. मात्र, माजी मंत्री अमित देशमुख (Amit deshmukh) यांनी मुक्कामाचा आग्रह केल्याने ते बुधवारी रात्री लातूर येथे मुक्कामी थांबले होते. (Rahul Gandhi News)

Rahul Gandhi, dheeraj deshmukh, Amit deshmukh
Dharashiv Lok Sabha News : तुळजापूर मुक्कामी शरद पवारांचा प्लॅन ठरला; 'या' नेत्याने घेतली गुप्तभेट?

राहुल गांधी लातूर येथून दिल्लीला जाणार होते. मात्र, रात्रीचे विमान उतरणे व उड्डाण करणे अशी सुविधा येथे नाही ही माहिती पायलटने दिल्यानंतर ते बिदर किंवा हैदराबाद येथील विमानतळाकडे जाणार होते. मात्र, माजी मंत्री अमित देशमुख यांनी आग्रह केल्याने ते हाॕटेल ग्रँड येथे मुक्कामी थांबले असून, अचानकपणे त्यांचा मुक्काम ठरल्याने सुरक्षा व्यवस्थेची अचानक धावपळ उडाली होती. राहुल गांधी हे हाॕटेल ग्रँड येथे मुक्कामी थांबणार असल्याचे समजताच पोलिसांची मोठी धावपळ झाली. या ठिकाणी पॊलिसांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचे सोलापूर येथील सभा आटपून सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास लातूर विमानतळावर आगमन झाले. या वेळी लातूर शहरचे आमदार अमित देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख, लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी त्यांचे स्वागत केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी रात्री हॉटेल ग्रँड सरोवर येथे मुक्काम केला. या वेळी त्यांच्या समवेत काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात महाराष्ट्रातील एकूण परिस्थितीच्या संदर्भाने चर्चा केली. या वेळी लातूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचाराला मिळत असलेल्या सकारात्मक प्रतिसादाची माहिती त्यांना अवगत करून देण्यात आली. लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस व महाविकास आघाडीकडून सुरू असलेल्या प्रचाराची त्यांनी माहिती जाणून घेतली व मार्गदर्शन केले. त्यासोबतच या वेळी राहुल गांधी यांनी मराठवाड्यातील अन्य जागेचा आढावा घेतला. त्यांच्या समवेत लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात महाराष्ट्रातील एकूण परिस्थितीच्या संदर्भाने चर्चा झाली.

विशेषतः राहुल गांधींनी मराठवाड्यातील काँग्रेस लढत असलेल्या लातूर, नांदेड, जालना या तीन जागांसह इतर महाविकास आघाडी लढत असलेल्या पाच जागांचा आढावा घेतला. या वेळी त्यांनी अमित देशमुख, धीरज देशमुख यांच्यासह काही ज्येष्ठ नेत्यांशी गुप्तपणे चर्चा करीत मराठवाड्यातील आठ मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या प्रचाराबाबत रणनीती ठरवली असल्याचे समजते. या वेळी मराठवाड्यातील काही प्रमुख नेतेमंडळी उपस्थित असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.

तत्पूर्वी सोलापूर येथील सभेला जाण्यापूर्वी राहुल गांधी लातूर विमानतळावर आले होते. या वेळी काँग्रेसचे नेते, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. त्यांचे स्वागत या वेळी आमदार अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख यांनी केले.

Rahul Gandhi, dheeraj deshmukh, Amit deshmukh
Dindori constituency 2024 : राष्ट्रवादीचा सडेतोड प्रश्न, 'अहो, भारतीताई पाच वर्षांत कांदा प्रश्नावर काय केले'..?

दरम्यान, बुधवारी लातूर येथील हाॕटेल ग्रँड येथे मुक्कामी थांबलेले राहुल गांधी गुरुवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास हॉटेलवरून लातूर येथील विमानतळाकडे रवाना झाले. तर त्या ठिकाणाहून ते खास विमानाने दिल्लीकडे रवाना झाले. राहुल गांधी यांनी लातूर येथील मुक्कामी महाविकास आघाडीकडून सुरू असलेल्या प्रचाराची माहिती जाणून घेत मार्गदर्शन केले. त्यामुळे येत्या काळात काँग्रेसला त्यांच्या मुक्कामाचा फायदा झाला की नाही हे पाहण्यासाठी 4 जूनच्या निकालाची वाट पाहावी लागणार आहे.

प्रियांका गांधींची 27 एप्रिलला सभा

लातूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधींची 27 एप्रिलला दुपारी तीन वाजता उदगीर येथे सभा होणार आहे. त्याची तयारी काँग्रेसकडून सुरू आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीवेळी अमित देशमुख यांच्या प्रचारार्थ ऑक्टोबर 2019 मध्ये राहुल गांधी यांची प्रचार सभा झाली होती.

R

Rahul Gandhi, dheeraj deshmukh, Amit deshmukh
Rahul Gandhi News : 'नरेंद्र मोदींची सवय आहे की, जेव्हा त्यांना भीती वाटते तेव्हा ते..'; सोलापूरच्या सभेत राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com