Kolhapur Lok Sabha Constituency: मंडलिकांच्या शिलेदाराचा गड शाहू महाराजांनी फोडला, एकट्या राधानगरीतून 15 हजारांचं लीड

Kolhapur Lok Sabha 2024 Results LIVE: कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील पाचव्या फेरी अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती हे आघाडीवर असून एकट्या राधानगरी मतदारसंघातून 14 ते 15 हजारांच लीड आहे.
Shahu Maharaj Sanjay Mandlik, Prakash Abitkar
Shahu Maharaj Sanjay Mandlik, Prakash AbitkarSarkarnama

Kolhapur Lok Sabha 2024 Results LIVE: कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील पाचव्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती हे आघाडीवर आहेत. चौथ्या फेरी अखेर जवळपास शाहू महाराज 20 हजार मतांपेक्षा जास्त मताने आघाडीवर आहेत. मात्र हे मताधिक्य मिळवण्यामागे राधानगरी विधानसभा मतदारसंघाची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.

कारण चौथ्या फेरीअखेर जवळपास 14 ते 15 हजारांचे मताधिक्य एकट्या राधानगरी विधानसभा मतदारसंघांनी दिलं आहे. त्या पाठोपाठ करवीर विधानसभा मतदारसंघाची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. राधानगरी विधानसभा मतदारसंघ म्हणजे खासदार संजय मंडलिक यांचे शिलेदार आमदार प्रकाश आबिटकर यांचा बालेकिल्ला आहे. पण हाच गड फोडण्याचे काम शाहू महाराज छत्रपती यांनी केलं आहे. (Radhanagari Assembly Constituency)

महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांच्या उमेदवारीवरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये बरीचशी रस्सीखेच झाली. मात्र खासदार मंडलिक यांना उमेदवारी मिळवण्यासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांनी पहिले पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shidne) यांना दिले. संजय मंडलिक यांना उमेदवारी द्यावी अशी आग्रही भूमिका घेणारे ते जिल्ह्यातील पहिले आमदार होते. खासदार मंडलिक यांचे आमदार प्रकाश आबिटकर हे शिलेदार म्हणून ओळखले जातात.

भाजपचे नेते आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी भाजपमधील नेत्यांनी टोकाची भूमिका घेतल्याची माहिती आहे. पण आमदार प्रकाश आबिटकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार मंडलिक यांच्या उमेदवारीसाठी ठाम राहिल्याने ही जागा शिंदे गटाच्या वाट्याला गेली.

Shahu Maharaj Sanjay Mandlik, Prakash Abitkar
Lok Sabha Result Live : दुसऱ्या फेरीअखेर मुश्रीफ घाटगेंनी राखले, राधानगरीतून के.पी पाटलांनी डाव पलटला? 

राधानगरी विधानसभा मतदारसंघावर आमदार प्रकाश आबिटकर यांची घट्ट पकड आहे. गेल्या दहा वर्षांपासून ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. राधानगरी भुदरगड तालुका मिळवून निर्माण झालेला विधानसभा मतदारसंघात लोकनेते स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांना मानणारा प्रचंड वर्ग आहे. काळमावाडी उजवा आणि डावा कालव्यावरून सुरू झालेला वाद संपुष्टात आणण्यासाठी सदाशिवराव मंडलिक यांची भूमिका महत्त्वाची ठरली. त्यामुळे मंडलिक प्रेमींची या मतदारसंघात संख्या अधिक आहे.

अशातच सुरुवातीला काँग्रेसमध्ये कार्यरत असलेले आमदार प्रकाश आबिटकर यांना शिवसेनेत आणण्यासाठी खासदार मंडलिक यांची भूमिका महत्त्वाची आहे. गेले दोन टर्म आबिटकर यांना आमदार करण्यासाठी मंडलिक यांचे विशेष प्रयत्न राहिले आहेत. तर मागील तीन लोकसभा निवडणुकीत खासदार मंडलिक यांच्या पाठीमागे राहण्याची भूमिका आबिटकर यांची आहे. राधानगरी विधानसभा मतदारसंघात असे चित्र असताना शाहू महाराज आणि राधानगरीचे ऋणानुबंध मत पेटीतून उमटले आहे.

Shahu Maharaj Sanjay Mandlik, Prakash Abitkar
Sunil Tatkare : अजितदादांसाठी गुड न्यूज! रायगडचा सुभेदार सुनील तटकरे आघाडीवर

राधानगरी विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार के. पी पाटील हे दिग्गज नेते असतानाही या मतदारसंघातून 20 हजार पैकी 15 हजारांचे मताधिक्य आहे. त्यामुळे मंडलिक यांच्या शिलेदाराचा गड पोखरण्यात शाहू महाराज छत्रपती आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांना यश आल्याचं दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com