Eknath Shinde News : 'आम्ही घटनाबाह्य सरकार, तर मग तुम्हीही घटनाबाह्य विरोधी पक्षनेते आहात का?'; शिंदेंचा अजित पवारांना सवाल

दादा, तुम्ही बोलता गोड; पण तुमचा कार्यक्रम सुरू असतो.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

Mumbai News: दाऊदशी संबंधित लोकांशी ज्यांचा संपर्क आला, त्यांना पाठीशी ज्यांनी घातलं. म्हणजे मी देशद्रोही म्हणालो का? पण, दादा, तुम्ही आम्हाला अगोदरच महाराष्ट्रद्रोही म्हणून टाकलं. आम्ही काय महाराष्ट्रद्रोह केला?. महाराष्ट्रद्रोही आम्ही सरकार आहोत. तुम्ही आम्हाला घटनाबाह्य सरकार म्हणता, मग तुम्हीही घटनाबाह्य विरोधी पक्षनेते आहात का? तेही एकदा सांगून टाका, असे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना दिले. (Are you an unconstitutional opposition leader? : Eknath Shinde's question to Ajit Pawar)

विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज जोरदार बॅटिंग केली. ते म्हणाले की, सरकारच्या कामगिरीवर बोलतील, असं मला अजितदादांकडून अपेक्षित होते. मात्र. सत्तेतून अचानक पायउतार झाल्यामुळे तुमच्या डोळ्यासमोर जी अंधारी आली आहे, त्यामुळे आम्ही जे काम करत आहेात, ते तुम्हाला दिसत नाही. दिसत असली तरी तुम्ही मान्य करू शकत नाहीत. ठीक आहे, ते तुम्ही अगोदरच ठरवलं आहे. पण, चांगल्याला चांगलं म्हणणं विरोधी पक्षाचं काम आहे.

Eknath Shinde
Fadnavis-Shinde On Ajit Pawar : ‘अजितदादांना सहशिवसेनाप्रमुख करा...’: शिंदे-फडणवीसांनी विधानसभेत घेतली पवारांची फिरकी

दादा, तुम्ही बोलता गोड; पण तुमचा कार्यक्रम सुरू असतो. (त्यावर अजित पवारांनीही कमेंट केली, माझा कार्यक्रम असतो; पण हा बाबा करेक्ट कार्यक्रम करतो) त्यामुळे पोटदुखीचे प्रसंग वारंवार येतील. त्यासाठी एक जालीम औषध शोधून ठेवावं लागले आपल्याला. आम्ही ते शोधून ठेवलं आहे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही सुरू केला आहे. त्यासाठी डॉक्टरही नेमले आहेत आम्ही. कंपाउंडर....नको कंपाउंडर नको आपल्याला. त्याच्या नादाला लागू नका, असेही शिंदे यांनी नमूद केले.

Eknath Shinde
Dhangekar Meet Girish Bapat : विजयानंतर रवींद्र धंगेकरांनी घेतली बापटांची भेट; खासदारांनी दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

शिंदे म्हणाले की, सत्तांतर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री न झाल्यामुळे धक्का बसला. राज्यपाल कोश्यारीही आवक झाले हेाते. असेही दादांनी भाषणात सांगितले. (तेवढ्यात समोरून फडणवीसांना माहिती नव्हतं, अशी कमेंट आली. त्यावर मला माहिती होते, असे उत्तर फडणवीसांनी दिले. मुख्यमंत्र्यांनीही आम्ही ठरवून घेतलेले आहे, सगळं असे स्पष्ट केले)

Eknath Shinde
Sandeep Deshpande Attack : संदीप देशपांडे हल्लाप्रकरणी नीतेश राणेंनी घेतले ठाकरेंच्या नातेवाईकाचे नाव

महाराष्ट्रद्रोहाचा विषय आपण काढला होता. मला अजित पवारांकडून ही अपेक्षा नव्हती. पण, नवाब मलिक यांनी दाऊदच्या माणसांशी व्यवहार केले. त्याबद्दल मलिक यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यांचा राजीनामा त्यावेळी घेतला नाही. त्यांना पाठीशी घालण्याचे काम करण्यात आले. मी त्यावेळी असं नाही म्हणाले, अजितदादा देशद्रोही आहेत म्हणून. मी असं म्हणाले की, ज्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे, त्या दाऊदशी संबंधित लोकांशी ज्यांचा संपर्क आला आहे, त्यांना पाठीशी ज्यांनी घातलं... म्हणजे देशद्रोही म्हणालो का मी? पण, तुम्ही आम्हाला महाराष्ट्रद्रोही अगोदरच म्हणून टाकलं. आम्ही काय महाराष्ट्रद्रोह केला आहे, असा सवालही शिंदे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com