Ashokrao Gaikwad : 'मनमंदिर'चे अशोकराव गायकवाड सध्या आहेत कुठे?

Congress Politics : असं काय घडलं की अशोकराव गायकवाड राजकारणापासून बाजूला गेले?
Ashokrao Gaikwad
Ashokrao GaikwadSarkarnama

विद्याधर कुलकर्णी

Sangli Political News : मनमंदिर उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि खानापूर तालुक्यातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते अशोकराव गायकवाड सध्या आहेत कुठे, असा प्रश्न सांगलीतील जनतेला पडलेला आहे. एकेकाळी संपूर्ण खानापूर तालुक्यामध्ये अशोकराव गायकवाड यांच्या नावाचा दबदबा होता.

अशोकराव गायकवाड जबरदस्त प्रभाव असलेले एकेकाळचे नेते होते. विटा नगरपालिकेमध्येही त्यांची कमालीची ताकद होती. विरोध आणि विरोधक म्हणजे काय हे त्यांनी त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांना दाखवून दिले होते. लोकांच्या मनामध्ये घर निर्माण करणारा नेता अशी त्यावेळी त्यांची ओळख निर्माण झाली होती. स्पष्टवक्तेपणा हा त्यांचा सर्वात मोठा गुण. आणि लोकांनाही तो खूप आवडत होता. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी घेतलेल्या भूमिका व निर्णय यामुळे त्यांचे राजकारणातील महत्त्व कमी होत गेल्याचे पाहायला मिळते.

Ashokrao Gaikwad
Ajit Pawar Vs Jayant Patil : अजितदादांची इस्लामपुरात एन्ट्री, पण जयंत पाटलांबाबत चुप्पी!

विधानसभेमध्ये ते नेतृत्व करू शकतील, अशी त्यांची प्रतिमा संपूर्ण मतदारसंघांमध्ये होती. मात्र, अचानक त्यांनी राजकारणाकडे दुर्लक्ष केले. नेतृत्व गुण त्यांच्याकडे असूनही त्यांना त्याचा लाभ घेता आला नाही. त्यांनी आपल्या मनमंदिर उद्योग समूहाकडे जास्त लक्ष देण्याची भूमिका घेतली.

दिवंगत माजी मंत्री पतंगराव कदम (Patangrao Kadam) यांच्यावेळी ते राजकारणात सक्रिय होते. पतंगरावांनी दिलेला शब्द अंतिम मानून त्यांनी माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्याशी हातमिळवणी केली. तिथेच त्यांचा राजकीय घात झाला आणि त्यांनी आपले राजकीय वजन कमी केल्याचे जाणकार मंडळी सांगतात. तेव्हापासूनच त्यांची लोकप्रियता कमी झाल्याचे सर्वांना पाहायला मिळू लागले. त्यानंतर मात्र त्यांना घरातूनच या हातमिळवणीला विरोध झाला. त्यांचे सख्खे बंधूही त्यांच्या विरोधात जाऊन स्थानिक आमदारांच्या विरोधी गटात गेले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विरोधात असताना अशोकरावांच्या (Ashokrao Gaikwad) बोलण्याला जी धार होती ती हातमिळवणी केल्यानंतर बोथट झाल्याचे तालुक्यातील जनतेला दिसून आले. मध्येच ते माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्याबरोबर दिसत होते. त्यानंतर माजी मंत्री विश्वजीत कदम यांच्यासोबतही ते पाहायला मिळत होते. परंतु, हे सर्व असतानाही त्यांना तितके महत्त्व प्राप्त झाले नाही. राज्यातील सर्व पक्षातील नेत्यांशी ते कायम संवाद करत राहिले. मात्र, राजकारणातल्या महत्त्वाच्या सत्ता आणि पदांपासून ते कायम वंचित राहिले.

आता ते काँग्रेस (Congress) पक्षाला समर्थन देऊन काम करत आहेत. तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती गटांमध्ये काँग्रेस पक्षाचे अस्तित्व नाही. आता सत्तेमध्ये भाजपा आणि त्यांचे मित्रपक्ष आहेत. अशावेळी काँग्रेस पक्षाला अशोकराव गायकवाड सत्तेपर्यंत घेऊन जातात का, हे पाहायला मिळणार आहे.

Ashokrao Gaikwad
Sangli District Planning Committee : नियोजन समितीवर अजितदादा गटाचे वर्चस्व; पण भाजप अन्‌ शिंदे गटालाही बरोबरचे स्थान

खानापूर तालुक्याच्या निर्मितीपासून कायम काँग्रेसचाच बोलबाला होता. आता काँग्रेसची झालेली अवस्था काँग्रेसप्रेमींना अजिबात मान्य नाही. त्यामुळेच काँग्रेसला नवसंजीवनी कुणाकडून प्राप्त होणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना पूर्वी अशोकराव गायकवाड यांनी राजकारणातून लोकांच्या मनात घट्ट स्थान निर्माण केले होते. ते स्थान आता डळमळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. आणि ते लोकांपासून दूर जात असल्याची खंत जनतेला वाटते आहे. मनमंदिर उद्योग समूहातून तालुक्यात वर्चस्व निर्माण करणारे अशोकराव गायकवाड राजकारणात वर्चस्व निर्माण करू शकले नाहीत, याची जनतेला खंत वाटते.

(Edited by Avinash Chandane)

Ashokrao Gaikwad
Loksabha Election 2024 : 'मविआ'च्या विशाल पाटलांच्या पायाला भिंगरी, भाजपचे संजयकाका, देशमुखांचा भेटीगाठीवर भर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com