Sangli News : सांगली जिल्हा नियोजन समितीवरील नियुक्तीवरून महायुतीमध्ये वाद रंगला होता. मात्र, त्यावर पडदा टाकत राज्य सरकारकडून समितीच्या सदस्यांची यादी जाहीर केली आहे. निमंत्रित २० सदस्यांच्या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने बाजी मारली. अजितदादा गटाला सर्वाधिक सहा, भाजपला पाच, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला चार जागांवर समाधान मानावे लागले आहे. आठवले गट, रयत क्रांती आणि राष्ट्रीय समाज पक्षाला प्रत्येकी एका जागेवर संधी देण्यात आली आहे. Sangli District Planning Committee
मागील दोन वर्षांपासून जिल्हा नियोजन समितीमधील निमंत्रित सदस्यांच्या निवडीवरून गोंधळ सुरू होता. पालकमंत्री सुरेश खाडे यांनी वेळोवेळी डीपीसीच्या बैठकीआधी निवडी होतील, असे स्पष्ट केले होते. महायुतीमध्ये भाजपसह एकनाथ शिंदे गट, जनसुराज्य शक्ती, आठवले गट आणि रयत क्रांती संघटना यांचा समावेश आहे. त्यामुळे कुणाला संधी द्यायची यावरून एकमत होत नव्हते. निमंत्रित सदस्यांच्या निवडीवरून अनेक वेळा मतभेद उफाळून आले होते. जिल्हा नियोजन समितीवरील शासन नियुक्त सदस्यांच्या यादीत जिल्हास्तरावरून प्रस्ताव पाठविले होते. मात्र निमंत्रित सदस्यांची यादी रखडली होती. (Sangli DPC)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महायुतीमध्ये अजित पवार गट सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या निवडी झाल्या होत्या. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांमध्ये नाराजी होती. याबाबत घटक पक्षातील नेते सदाभाऊ खोत यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर वीस जणांच्या निमंत्रित सदस्यांची यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये अजितदादा गटाला सर्वाधिक सहा, भाजपला पाच तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला चार जागांवर स्थान मिळाले आहे.
नियोजन समितीवर आमदार सुधीर गाडगीळ (सांगली, भाजप), माजी आमदार विलासराव जगताप (जत, भाजप), शिवसेना शिंदे गट जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार (इस्लामपूर, शिवसेना शिंदे गट) याचबरोबर विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख (कडेपूर, भाजप), माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख (कोकरुड, भाजप), जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भीमराव माने (कवठेपिराण, शिवसेना शिंदे गट), पोपट कांबळे (मिरज, आठवले गट), विनायक जाधव (कसबे डिग्रज, रयत क्रांती), जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर (गार्डी, शिवसेना शिंदे गट) व जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील (आटपाडी, शिवसेना शिंदे गट) यांची निवड करण्यात आली आहे.
अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील (विटा), शहराध्यक्ष पद्माकर जगदाळे, पुष्पा जयवंत पाटील (करगणी, ता. आटपाडी), सुनील पवार (सनमडी ता. जत), याशिवाय जनसुराज्य युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, खासदार गटाचे सुनील पाटील (विसापूर ता. तासगाव), राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण सरगर, अजितदादा गटाचे माजी नगरसेवक अतहर नायकवडी आणि बिरेंद्र थोरात यांच्या नावाचा नियोजन समितीच्या सदस्यांमध्ये समावेश आहे.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.