IAS Shrikant Khandekar : राम शिंदेंच्या IAS जावयाचा दबदबा; मोदींनी पिंजून काढलेल्या राज्याच्या राजधानीची मोठी जबाबदारी आली खांद्यावर

Ram Shinde son in law IAS : श्रीकांत खांडेकर हे मुळचे मंगळवेढ्यातील बावची गावातील आहे. २०२१ मध्ये त्यांचा राम शिंदे यांच्या लेकीशी विवाह झाला आहे.
IAS Shrikant Khandekar, Ram Shinde
IAS Shrikant Khandekar, Ram ShindeSarkarnama
Published on
Updated on

IAS officer posting : विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे IAS जावई श्रीकांत खांडेकर यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. एका राज्याच्या राजधानीच्या शहरात मोठ्या पदावर त्यांची बदली झाली आहे. त्यांनी आपल्या कामाच्या जोरावर प्रशासनात दबदबा निर्माण केला आहे. त्यामुळे त्यांच्या या बदलीची चर्चा होत आहे.

IAS खांडेकर हे २०२० च्या तुकडीचे बिहार केडरचे अधिकारी आहेत. बिहारची राजधानी असलेल्या पटनाच्या उपजिल्हाधिकारी पदावर त्यांची बदली करण्यात आली आहे. पटनामध्ये हे पद उप विकास आयुक्त म्हणून ओळखले जाते. त्याआधी ते नालंदा येथे याच पदावर कार्यरत होते. मात्र, आता राज्याच्या राजधानीत त्यांना बढती मिळाली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज २३ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यामध्ये खांडेकर यांचाही समावेश आहे.

कोण आहेत श्रीकांत खांडेकर?

श्रीकांत खांडेकर हे मुळचे मंगळवेढ्यातील बावची गावातील आहे. याच गावात त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर सोलापूरात बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी दापोली येथील कृषी विद्यापीठातून कृषी अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि ते पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाले. देशात ३३ व्या क्रमांकाने त्यांनी IAS चा टप्पा गाठला.

IAS Shrikant Khandekar, Ram Shinde
Santosh Deshmukh case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या ‘त्या’ चौकशी अहवालावर सरकारने घेतला मोठा निर्णय; कारवाईवर होणार फैसला

खांडेकर यांची IAS म्हणून निवड झाल्यानंतर राम शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला होता. त्यानंतरच शिंदे यांनी खांडेकरांना जावई म्हणून पसंत केले होते. शिंदेंची डॉक्टर कन्या अक्षता आणि श्रीकांत खांडेकर यांचा जून २०२१ मध्ये विवाह झाला आहे. खांडेकर यांना बिहार केडर मिळाल्याने ते मागील सहा वर्षांपासून तिथेच आहेत.

IAS Shrikant Khandekar, Ram Shinde
Ambernath Election : अंबरनाथमध्ये भाजपला मोठा धक्का; शिंदेंनी मनसुबे उधळले, रविंद्र चव्हाणांच्या खेळीला शह देत सत्ता काबीज

लाठीचार्ज

ऑगस्ट २०२४ मध्ये पाटणामध्ये नियुक्तीस असताना भारत बंददरम्यान पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये श्रीकांत खांडेकर यांना चुकून लाठी खावी लागली होती. त्याची देशभरात चर्चा झाली होती. आंदोलकांना पांगविताना पोलीस अधिक आक्रमक झाले होते. यावेळी स्वत: खांडेकर हेही रस्त्यावर उतरून कायदा-सुव्यवस्था बिघडू नये, याची काळजी घेत होते. याचदरम्यान पाठीमागून आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना लाठीने मारले होती. इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना लक्षात आणून दिल्यानंतर त्याने माफी मागितली होती. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com