South Solapur Assembly : एक अनार, सौ बीमार; सोलापूर दक्षिणमधून काँग्रेसची लॉटरी कुणाला लागणार?

South Solapur Assembly Election 2024 : सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून बाबा मिस्त्री, दिलीप माने, सुरेश हसापुरे, धर्मराज काडादी आदी इच्छुक आहेत. यापैकी कोणाला उमेदवारी द्यायची, असा पेच काँग्रेससमोर निर्माण होणार आहे.
dharmraj kadadi | suresh hasapure | baba mistri | dilip mane
dharmraj kadadi | suresh hasapure | baba mistri | dilip manesarkarnama
Published on
Updated on

Solapur News : गेल्या निवडणुकीत सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या निष्काळजीपणामुळे विजयापासून दूर राहिलेले बाबा मिस्त्री यांनी यावेळी पुन्हा दावेदारी केली आहे.

याच मतदारसंघातून 2009 मध्ये विजयी झालेले दिलीप माने यांच्यासह, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश हसापुरे, धर्मराज काडादी आदी इच्छुक असल्यामुळे काँग्रेसची उमेदवारी मिळवण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे.

आपल्या सामाजिक कार्यामुळे सोलापूरचे 'धंगेकर' अशी ओळख असलेले बाबा मिस्त्री (मौलाली बाशूमियाँ सय्यद) यांना उमेदवारी मिळणार की, काँग्रेस नव्या चेहऱ्याला संधी देणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

गेल्या निवडणुकीत भाजपचे (Bjp) मातब्बर नेते, राज्याचे तत्कालीन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याविरोधात मिस्त्री यांनी निवडणूक लढवली होती. देशमुख यांना 87,233 तर मिस्त्री यांना 57,976 मते मिळाली होती. मिस्त्री यांची कोणतीही तयारी नव्हती, तरीही त्यांना इतकी मते मिळाली होती. देशमुख यांच्या तुलनेत मिस्त्री यांची यंत्रणा तोकडी होती. पक्षाच्या मोठ्या नेत्यांनीही त्यांच्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते.

खासदार प्रणिती शिंदे या त्यावेळी सोलापूर मध्य मतदारसंघातून काँग्रेसच्या (Congress) उमेदवार होत्या. त्यामुळे पक्षाचे सर्व लक्ष प्रणिती यांच्या मतदारसंघावर होते. तोकडी यंत्रणा, आर्थिक बाजू कमकुवत असतानाही मिस्त्री यांनी स्वतःच्या सामाजिक कार्याच्या, संपर्काच्या बळावर जवळपास 58 हजार मते मिळवली होती. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश हसापुरे हेही या मतदारसंघातून इच्छुक आहेत, अशी चर्चा आहे.

प्रणिती शिंदे आता खासदार झाल्या आहेत. त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने इच्छुकांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला. या निमित्ताने मिस्त्री यांनीही मतदारसंघात संपर्क वाढवला.

गेल्या निवडणुकीत पक्षाने आणखी थोडा जोर लावला असता तर मिस्त्री कदाचित विजयी झाले असते, असे राजकीय वर्तुळात बोलले जाते. सामान्य नागरिकांसाठी 24 तास उपलब्ध असणारा नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे.

त्यांनी 1997 मध्ये पहिल्यांदा सोलापूर महापालिकेची निवडणूक लढवली. ते सलग चारवेळा विजयी झाले आहे. ते पहिल्यांदा विजयी झाले त्यावेळी त्यांनी काही रुग्णांना घेऊन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जावे लागले होते. तेथील परिस्थिती पाहून त्यांनी रुग्णांना मदत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांची ही सेवा अविरत सुरू आहे.

dharmraj kadadi | suresh hasapure | baba mistri | dilip mane
Narsayya Adam Master : आडम मास्तरांची ‘सोलापूर शहर मध्य’साठी जोरदार फिल्डिंग; पवारांपासून शिंदेंपर्यंत गाठीभेटी!

बाबा मिस्त्री, माजी आमदार दिलीप माने यांनीही सोलापूर दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसकडे उमेदवारी मागणी केली आहे. सामाजिक कार्य आणि लोकांच्या कायम संपर्कात राहणार नेता, या बाबा मिस्त्री यांच्या जमेच्या बाजू आहेत.

दिलीप माने यांचे या मतदारसंघात संस्थात्मक जाळे आहे, त्यामुळे त्यांची यंत्रणा आहे. त्यांना राजकीय वारसाही आहे. दिलीप माने हे मध्यंतरी शिवसेनेत गेले होते. काही महिन्यांपूर्वी ते काँग्रेसमध्ये परत आले आहेत.

बाबा मिस्त्री हे अत्यंत सामान्य परिस्थितीतून पुढे आलेले आहेत. त्यांना मजुरीही करावी लागली होती. नगरसेवक झाल्यानंतर त्यांनी जनतेशी ठेवलेला संपर्क आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये थांबून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना ते करत असलेले सर्वप्रकारची मदत यामुळे ते लोकप्रिय आहेत. पुण्यातीस कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर ज्याप्रमाणे लोकांची कामे करतात, लोकांच्या संपर्कात राहतात, तशाच पद्धतीने बाबा मिस्त्री यांचेही काम सुरू असते.

काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश हसापुरे यांचाही या मतदारसंघात संपर्क आहे. जिल्हा बँकेचे संचालक म्हणून त्यांनी या भागात आपले जाळे निर्माण केलेले आहे. अशा परिस्थितीत उमेदवारी कोणाला द्यावी, अशी अडचण काँग्रेसमोर निर्माण होऊ शकते.

वाद नको म्हणून या इच्छुकांना डावलून काँग्रेस नव्याच उमेदवाराला संधी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत हसापुरे यांनी सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघात प्रणिती शिंदे यांची प्रचारयंत्रणा हाताळली होती. ग्रामीण भागात त्यांचा चांगला संपर्क आहे. शहरी भागात मात्र त्यांच्या संपर्काची अडचण थोडीशी अडचण असल्याचे सांगितले जाते.

सिद्धेश्वर सहकारी कारखान्याचे सर्वेसर्वा धर्मराज काडादी यांचेही नाव या मतदारसंघातून चर्चेत आले आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात या मतदारसंघातील गांवाचा समावेश आहे. काडादी यांचे शैक्षणिक संस्थांचेही जाळे आहे. सोलापूरच्या विमानसेवेला अडथळा ठरत असल्याचे कारण पुढे करून या कारखान्याची चिमणी गेल्यावर्षी पाडण्यात आली. असे असले तरी सोलापूरची विमानसेवा अद्याप सुरू झालेली नाही.

चिमणीवरून त्यावेळी मोठे राजकारण झाले होते. चिमणी पाडल्यामुळे भाजपचे सोलापुरातील दोन्ही आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांच्याविरोधात सभासदांमध्ये रोष निर्माण झाला होता.

चिमणी पाडली त्यावेळी आमदार रोहित पवार यांनी सोलापुरात येऊन काडादी यांची भेट घेतली होती. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या माध्यमातून ऐनवेळी काँग्रेसकडून काडादी यांचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे. इच्छुकांच्या गर्दीमुळे उत्सुकता वाढली आहे.


( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com