पंकज रोडेकर
Thane: 'तेलही गेले तुपही गेले हाती आले धुपाटने' अशी अवस्था सद्यस्थितीत उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची झाली आहे. आता ना पक्ष ना त्या पक्षाचे नाव आणि चिन्ह. यापूर्वी कधी ही संघर्ष करण्यासाठी पुढाकार न घेणारे उध्दव ठाकरे मात्र आता वाघाप्रमाणे आक्रमक झाले आहेत.
हा आक्रमकपणा त्यांनी संघटनेची सूत्रे हाती घेतल्यावर ठेवली असती. गद्दारी सोडा हे दिवस सुद्धा आले नसते. आता स्वकर्तुत्वाने उद्धवांना हा लढा लढायचा आणि तो समर्थपणे जिंकायचा आहे. पण, त्यांच्या विरोधात त्यांचे मित्रपक्ष आणि एकेकाळचे निटवर्ती शिलेदार आहेत. उध्दव ठाकरेंनी आक्रमकपणा कल्याण लोकसभा मतदारसंघातील दौऱ्याने प्रखरतेने दिसून आला. नेहमीच शांत स्वभावाने सुपरिचित असताना आक्रमकपणा धारण केल्यावर त्यांना बाळासाहेबांच्या शिवसैनिकांची कशी साथ मिळते ते ही पाहावे लागणार आहे.
बाळासाहेबांचा खरा वैचारिक वारसदार म्हणून राज ठाकरे यांच्याकडे सुरुवातीपासून पाहिले जात होते. मात्र बाळासाहेबांच्या पुत्रप्रेमा पुढे राज यांनी स्वतःहून संघटनेतून पाय काढता घेतला. संघटना हाती आल्यावर उध्दव ठाकरे यांनी ती वाढवली. पण, बाळासाहेबांप्रमाणे आक्रमकपणा त्यांना त्यांच्या शांत आणि मृदु स्वभावामुळे धारण करता आला नाही.
त्यांनी स्वतःपेक्षा काही शिवसैनिकांवर अतिविश्वास ठेवला. हाच चांगुलपणा त्यांच्या अंगाशी आला. याचदरम्यान विरोधकांनी टाकलेल्या डावातच ते दिवसेंदिवस फसत गेले. आता त्यांच्याकडे ना संघटना राहिली आहे. त्या संघटनेचे नाव आणि चिन्ह. त्यामुळे बाळासाहेबांनी ज्या मराठी माणसासाठी सुरू केलेली संघटना गेल्याने उध्दव ठाकरेंनी देर आये दुरुस्त.. अशाप्रकरे शांत स्वभावाला झटकून बाळासाहेबांचे आक्रमकपणाच्या धोरणाचे कवच अंगी धारण करत एका योद्ध्याप्रमाणे लढण्यासाठी स्वार झाल्याचे दिसत आहे.
शनिवारी दिवसभर शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना असलेल्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण मतदार संघातून दौरा करत, त्यांनी थेट मुख्यमंत्री शिंदे यांनाच हात घातला आहे. त्याच शिंदे यांच्या दगा फटल्याने ठाकरे हे जखमी वाघासारखे चवताळून उठले आहेत. त्यातच डोंबिवली ही उध्दव ठाकरे यांची सासरवाडी आहे. ही त्यांची एक जमेची बाजू आहे. जर एखाद्या सासरवाडीतून जावई रुबाबामधून निघाल्यावर त्याचा रुबाब हा कायम राहतो. त्यामुळे त्यांनी आपली आक्रमकपणाचे शस्त्रे अंगी धारण करण्यासाठी शत्रूचे अंगण आणि सासरवाडी निवडली असावी, असे बोलले जात आहे. शिवाय, हा बालेकिल्ला कोणाचा ही असो. लाडक्या लेकीसाठी डोंबिवली-कल्याणकर जावयाला नाराज करील का ? हे सुद्धा पाहावे लागणार आहे.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.