ज्ञानेश्वर पाटील, महेश गावित यांना लोकसभेची उमेदवारी

भाजपकडून गुरूवारी देशातील लोकसभा व विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
BJP
BJP
Published on
Updated on

नवी दिल्ली : भाजपकडून गुरूवारी देशातील लोकसभा व विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील खांडवा लोकसभा मतदारसंघातून ज्ञानेश्वर पाटील तर दादरा व नगर हवेली मतदारसंघातून महेश गावित यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मंडी लोकसभेचे उमेदवार म्हणून ब्रिगेडियर (निवृत्त) खुशाल ठाकूर यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे.

देशातील तीन लोकसभा मतदारसंघ व 16 विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली. ही पोटनिवडणूक ३० ऑक्टोबरला होणार आहे. महेश गावित हे दादरा व नगर हवेलीतील भाजपचे युवा कार्यकर्ते आहेत. ते पोलिस उपनिरीक्षक होते. तर ज्ञानेश्वर गावित हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विश्वासू मानले जातात.

BJP
भाजपकडून कंगनाचा पत्ता कट; लोकसभेच्या उमेदवारांची घोषणा

दरम्यान, हिमाचल प्रदेशातील मंडी पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अभिनेत्री कंगना राणावत (kangana ranaut) हीच्या नावाची चर्चा होती. कंगना राणावत ही मंडी जिल्ह्यातील भांबला गावातील आहे आणि तिने आपले नवीन घर मनालीमध्ये बांधले आहे, जे मंडी लोकसभा मतदारसंघात येते. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्येही या उमेदवारांबाबत चर्चा सुरू होती. मात्र, कंगनाने निवडणूक लढवण्याची इच्छा उघडपणे व्यक्त केलेली नव्हती.

देशात निवडणूक आयोगानं ३ लोकसभा मतदार संघांच्या पोटनिवडणुका जाहीर केल्या. त्यामध्ये मध्य प्रदेशातील खांडवा मतदारसंघ, हिमाचल प्रदेशातील मंडी आणि दादरा नगर हवेली मतदारसंघांची पोटनिवडणूक येत्या 30 ऑक्टोबर रोजी होणार आहे. आसाममधल्या ५, पश्चिम बंगाल मधल्या ४, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि मेघालयातील प्रत्येकी ३, राजस्थान, बिहार आणि कर्नाटकातील प्रत्येकी २ मतदारसंघांचा समावेश आहे.

आंध्र प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, मिझोरम, नागालँड आणि तेलंगणातील प्रत्येकी एका मतदारसंघातही याच दिवशी निवडणूका होत आहेत. लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीसाठी १ ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी केली असून ८ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com