बसणार नाही, बसणार नाही म्हणणारे भास्कर जाधव पुन्हा त्या `हाॅट सीट`वर!

Bhaskar Jadhav हे तालिकेवर असताना भाजपचे 12 आमदार निलंबित झाले होते..
Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhavsarkarnama

मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार निलंबन प्रकरणी विरोधी पक्षाचा रोष ओढवून घेणारे शिवसेना (Shiv Sena) आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांची गुरुवारी विधानसभा तालिका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Budget Session) आजच्या (ता.३ मार्च) पहिल्या दिवशी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी तालिका अध्यक्षांची नावे जाहीर केली. या यादीत आमदार संजय शिरसाट, दीपक चव्हाण, कुणाल पाटील, कालिदास कोळंबकर यांचाही समावेश आहे.

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्यावरुन भाजप आक्रमक झाला आहे. तसेच ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) विषयी सभागृहात पुन्हा तापणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच आक्रमक स्वभावाच्या भास्कर जाधव यांना पुन्हा एका महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने तालिका अध्यक्षांच्या खुर्चीवर बसवले आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध जाधव यांच्यात पुन्हा संघर्ष होणार का अशी शंका उपस्थित केली जात आहे. तर जाधव यांना तालिका अध्यक्ष करुन आघाडीनेही जशास तसे उत्तर देण्याची भूमिका घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Bhaskar Jadhav
भाषण न करता राज्यपाल निघून गेले ; 'शिवाजी महाराज की जय' घोषणांनी सभागृह दणाणले

गेल्या पावसाळी अधिवेशनात ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरुन झालेल्या गोंधळामुळे भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले होते. त्यानंतर या निलंबित आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने हे निलंबन असंवैधानिक असल्याचे स्पष्ट करून ते निलंबन रद्द करण्याचा निर्णय दिला होता. त्यानंतर आपण पुन्हा तालिका अध्यक्षांच्या खुर्चीवर बसणार नाही, असे तत्कालिन तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी सांगितले होते.

Bhaskar Jadhav
त्या 22 सेकंदात मुख्यमंत्री ठाकरे, अजित पवार यांच्यासह सारे सभागृह स्तब्ध!

ओबीसी आरक्षणावरून विधानसभेत गोंधळ झाला तेव्हा तालिका अध्यक्ष भास्कर जाधव होते. गोंधळानंतर विधानसभेचे कामकाज तहकूब करुन अध्यक्षांच्या दालनात जाधव गेले असताना तेथे भाजपच्या सदस्यांनी जाधव यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर सभागृहाने भाजपच्या १२ आमदारांना पुढील कालावधीसाठी निलंबित केले होते. या निलंबनावरुन भाजपने महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. या सर्व प्रकरणाच्या केंद्रस्थानी भास्कर जाधव राहिले होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना जाधव म्हणाले होते, जेव्हा-जेव्हा सरकारला माझ्या अनुभवाची, अभ्यासची आणि निर्णय क्षमतेची गरज भासते तेव्हा ते मला तालिका अध्यक्ष म्हणून अध्यक्षांच्या खुर्चीवर बसवतात. पण एकदा का त्या खुर्चीवर बसलो की मी पक्ष बाजूला ठेवून बसतो. जिथे आक्रमक होण्याची गरज असते तिथे आक्रमक होतो. जिथे संयम पाळायचा असतो तिथे संयम पाळतो. कायदे-नियम सांगतो. सत्ताधाऱ्यांचे चुकले तर चूक दाखवून देतो. विरोधी पक्षांची बाजू बरोबर असताना बरोबर आहे म्हणून सांगतो. त्यामुळे अल्पावधीत चांगले काम करू शकलो याचे मला समाधान आहे. मात्र, मी पुन्हा तालिका अध्यक्ष म्हणून त्या खुर्चीवर जाऊन बसणार नाही, असे त्यांनी सांगितले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतरही महाविकास आघाडीने त्यांच्या नावाला पसंती दिल्याचे दिसून आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com