Bihar Politics : नितीश कुमारांच्या टोपीच्या राजकारणाची चर्चा केंद्रस्थानी! बिहारमध्ये मुस्लिम फॅक्टर किती महत्वाचा?

Bihar Politics : बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुस्लिमांची टोपी डोक्यावर परिधान करण्यास नकार दिल्यानं ते टीकेचे धनी ठरले आहेत. हा मुद्दा आता इथल्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे.
Bihar CM Nitish Kumar
Bihar CM Nitish KumarSarkarnama
Published on
Updated on

Bihar Politics : बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार हे आपल्या एका कृतीमुळं टीकेचे धनी झाले आहेत. राज्य मदरसा शिक्षण मंडळाच्या शताब्दनिमित्त पाटण्यात झालेल्या कार्यक्रमात नितीश कुमार यांनी गोल टोपी घालण्यास नकार दिला आणि ती टोपी मंत्री जमा खान यांच्या डोक्यावर घातली. त्यांच्या या कृतीमुळं मुस्लिमांचा त्यांनी अपमान केला असल्याची टीका केली जात आहे. तर दुसरीकडं लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी बिहारमध्ये वोटर अधिकारी यात्रेदरम्यान मुंगेरमधील खानकाह रहमानी मशिदीच्या मौलानांची भेट घेतली होती. याठिकाणी त्यांचं उत्साहत स्वागतही करण्यात आलं होतं.

Bihar CM Nitish Kumar
PMC Ward Restructure: भाजपचा सिक्रेट गेम! अजित पवारांच्या शिलेदारांचे प्रभाग वेडेवाकडे तोडले; आता नेते थेट संघर्षाच्या तयारीत

राहुल गांधींच्या यात्रेच्या सहाव्या दिवशी त्यांनी मौलानांची भेट घेतली तत्पूर्वी एक दिवस आधीच नितीश कुमार यांनी मुस्लिमांची टोपी डोक्यावर घालण्यास नकार दिला होता. त्यामुळं काँग्रेससह आरजेडीनं मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका केली होती. त्यांनी नितीश कुमारांची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी तुलना केली. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध राज्यांमध्ये गेल्यानंतर तिथल्या स्थानिकांच्या टोप्या आपल्या डोक्यावर चढवतात. पण अशाच एका कार्यक्रमात त्यांनी मुस्लिमांची गोल टोपी डोक्यावर घालण्यास नकार दिला होता.

Bihar CM Nitish Kumar
ADR Report: देशातील 40 टक्के मुख्यमंत्र्यांवर फौजदारी गुन्हे! फडणवीस, चंद्राबाबूंसह...; ADRच्या अहवालातून खळबळजनक खुलासा

पण आता बिहारमध्ये हा टोपीचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. कारण इथं नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. तत्पूर्वी प्रचारात हा मुस्लिमांची टोपी नाकारण्याचा म्हणजेच मुस्लिमांना नाकारण्याचा मुद्दा ऐरणीवर येऊ शकतो. यामध्ये नितीश कुमार यांचीच मात्र मोठी कोंडी होणार आहे. कारण त्यांचा जनता दल युनायटेड हा पक्ष केंद्रात भाजपसोबत सत्तेत आहे. राज्यातही ते एकत्रित निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळं भाजपला नाराज करुन हिंदू मतांपासून दूर जाणं त्यांना जमणार नाही. त्यामुळंच त्यांनी मुस्लिमांची टोपी नाकारण्याचं पाऊल उचललं.

Bihar CM Nitish Kumar
India Pakistan Cricket: भारत-पाकिस्तान क्रिकेटला सरकारची मंजुरी! "पहलगाममधील शहिदांच्या कुटुंबियांना विचारलत का?"

दरम्यान, बिहारमध्ये मुस्लिमांची संख्या एकूण लोकसंख्येच्या १७.७० लाख इतकी आहे. आता निवडणुकीच्या काळात ही मतं आपल्या पारड्यात पडावी यासाठी सर्वच पक्षांची चढाओढ असते. त्यात भाजप आणि जेडीयूच्या युतीला या टोपी प्रकरणामुळं फटका बसू शकतो. त्यामुळं अर्थातच इंडिया आघाडीला अर्थात लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या महागठबंधनला याचा फायदा होऊ शकतो.

बिहारमधील मुस्लिमांच्या मतांच्या विभागणीचा इतिहास पाहिल्यास सन २०१० मध्ये नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यांच्या पक्षाला धोबीपछाड देत ११५ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी भाजपला ९१ जागा मिळाल्या होत्या. यावेळी मुस्लिमांची आणि अतिमागास वर्गाची मतं मोठ्या प्रमाणावर नितीश कुमार यांना मिळाली होती. तर लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाची हीच पारंपारिक मतं नितीश कुमार यांच्याकडं वळाली होती. त्यामुळं राजदला केवळ २२ जागांवरच समाधान मानावं लागलं होतं. त्यानंतर दहा वर्षांनी अर्थात २०२० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजदला ८५ जागा मिळाल्या होत्या आणि तो सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com