अनिल परब यांच्या अटकेसाठी भाजप आक्रमक; पोलिस अधिक्षकांना दिलं पत्र

परब यांच्यावर तातडीनं गुन्हा दाखल न केल्यास त्याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, अशा इशाराही भातखळकर यांनी दिला आहे.
BJP demands arrest of Minister Anil Parab over Narayan Rane issue
BJP demands arrest of Minister Anil Parab over Narayan Rane issue
Published on: 
Updated on: 

मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दबावानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. न्याय प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा गुन्हा असल्याचा दावा करत भाजपने परब यांना अटक करण्याची मागणी रत्नागिरीच्या पोलिस अधिक्षकांकडे केली आहे. (BJP demands arrest of Minister Anil Parab over Narayan Rane issue)

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी या मागणीचे पत्र पोलिस अधिक्षकांना दिलं आहे. परब यांच्यावर तातडीनं गुन्हा दाखल न केल्यास त्याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, अशा इशाराही भातखळकर यांनी दिला आहे. पोलिसांनी बळाचा वापर करून राणे यांना बेकायेशीरपणे अटक करण्यासाठी परब यांनी पदाचा गैरवापर केला आहे. राणे यांच्या जनआशिर्वाद यात्रेला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे ठाकरे सरकारने सूडबुद्धीने केलेली अटकेची कारवाई केली, असं भातखळकर म्हणाले. 

राणे यांना अटक करण्यापूर्वी परब यांनी पत्रकार परिषदेदरम्यान रत्नागिरीच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोनवरून ‘कोणती ऑर्डर मागत आहे? कोर्टबाजी वगैरे होत राहील, तुम्ही पोलीस फोर्स वापरून त्याला ताब्यात घ्या’ अशी वक्तव्य केल्याचं समोर आलं आहे. हे न्याय प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गुन्हा असल्याचं भातखळकर यांनी म्हटलं आहे. 

अर्नेश कुमार खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार कलम 41(1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीला अटक करण्यापूर्वी नोटीस देणं आवश्यक आहे. पण अशी नोटीस न देता राणे यांना अटक करण्यात आली. हा न्यायालयाचा अवमान आहे. त्याचीही दखल घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी भातखळकर यांनी पोलिस अधिक्षकांकडे केली आहे. 

परब यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला नाही तर उच्च न्यायालयात दाद मागू. कायद्याचे पालन न केल्यास पोलिसांच्या विरोधातही न्यायिक प्राधिकरणात तक्रार केली जाईल, अशा इशारा भातखळकर यांनी दिला आहे. भातखळकर यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी परब यांच्या वक्तव्याच्या व्हिडीओवरून त्यांची टीका केली आहे. त्यामुळं परब अडचणीत आले आहेत. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com