B.S.Yediyurappa and B.Y.Vijayendra
B.S.Yediyurappa and B.Y.Vijayendra

येडियुरप्पांनी डोळे वटारताच भाजप नरमली; मुलावर सोपवली मोठी जबाबदारी

येडियुरप्पांनी आक्रमक भूमिका घेतल्याने अखेर भाजप नेतृत्वाने आपली चूक सुधारून विजयेंद्र यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.
Published on

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) विधानसभा पोटनिवडणुका होत आहेत. या निवडणुकींसाठी प्रभारींची यादी भाजप (BJP) नेतृत्वाने जाहीर केली होती. माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांचे पुत्र व भाजपचे उपाध्यक्ष बी.वाय.विजयेंद्र (B.Y.Vijayendra) यांना यातून वगळण्यात आल्याने सगळ्यांनाच धक्का बसला होता. यानंतर येडियुरप्पांनी आक्रमक भूमिका घेतल्याने अखेर भाजप नेतृत्वाने आपली चूक सुधारून विजयेंद्र यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी बसवराज बोम्मई आले आहेत. येडियुरप्पांवर पक्षाने अद्याप कोणतीही जबाबदारी दिलेली नाही. त्यांचे पुत्र विजयेंद्र हे राज्य भाजपचे उपाध्यक्ष आहेत. नवीन मंत्रिमंडळात विजयेंद्र यांना स्थान देण्यात न आल्याने मोठा गदारोळ उडाला होता. आता कर्नाटकात सिंदगी आणि हनगळ या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत. परंतु, पक्षाने या निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रभारींच्या यादीत विजयेंद्र यांचा समावेश नव्हता.

यानंतर येडियुरप्पा समर्थकांनी जाहीरपणे भाजप नेतृत्वाला लक्ष्य करण्यास सुरवात केले होते. येडियुरप्पांनी आपल्या समर्थकांना शांत राहण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येडियुरप्पा यांनी या सर्व प्रकाराबद्दल पक्ष नेतृत्वाकडे विचारणा केली होती. यातच येडियुरप्पांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर येऊ लागले. अखेर पक्षाने विजयेंद्र यांच्या प्रभारीची जबाबदारी सोपवली.

B.S.Yediyurappa and B.Y.Vijayendra
'रावणा'च्या निधनाचं नरेंद्र मोदींना दु:ख पण...

येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या राजकीय पुनर्वसनाचा मोठा प्रश्न भाजप नेतृत्वासमोर आहे. येडियुरप्पांना त्यांचे पुत्र व पक्षाचे उपाध्यक्ष बी.वाय.विजयेंद्र यांच्यामुळे राजीनामा द्यावा लागल्याची चर्चा होती. तसेच, विजयेंद्र यांना नव्या मंत्रिमंडळातही स्थान देण्यात आले नव्हते. येडियुरप्पांनी आग्रह धरूनही नेतृत्वाने विजयेंद्र यांना डावलले होते. यामुळे येडियुरप्पा नाराज असल्याची चर्चा आहे. यामुळे पक्ष नेतृत्वाची डोकेदुखी वाढली आहे.

B.S.Yediyurappa and B.Y.Vijayendra
व्हिडीओ व्हायरल झाल्यानं मंत्र्याचा मुलगा अडचणीत

येडियुरप्पांच्या रुपाने दक्षिणेत भाजपचा पहिला मुख्यमंत्री झाला होता. येडियुरप्पांची मुख्यमंत्रिपदाची ही चौथी टर्म होती. त्यांच्या चौथ्या टर्ममधील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी बोम्मई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. बोम्मई हे येडियुरप्पा यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. येडियुरप्पा यांच्या संमतीनेच त्यांची निवड झाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com