भाजपचं 24 तासांत जशास तसं उत्तर! अखिलेश यादवांचा जवळचा नातेवाईकच फोडला

समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या आमदारांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.
BJP
BJPSarkarnama
Published on
Updated on

लखनौ : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) पुढील दोन महिन्यांत विधानसभा निवडणूक (Assembly Election) होत आहे. या निवडणुकीमुळे अनेक पक्षांकडून इतर पक्षांचे आमदार फोडण्याचे सत्र सुरू झाले आहे. आता समाजवादी पक्षासोबत (Samajwadi Party) काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. दोन्ही पक्षांच्या एका-एका आमदाराने भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे भाजपच्या गळाला लागलेला समाजवादी पक्षाचा आमदार अखिलेश यादवांचा जवळचा नातेवाईक आहे.

समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या दोन आमदारांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यात सहारणपूरमधील बेहात मतदारसंघाचे आमदार नरेश सैनी, फिरोजाबादमधील सिरसागंज मतदारसंघाचे आमदार हरीओम यादव यांचा समावेश आहे. याचबरोबर समाजवादी पक्षाचे माजी आमदार धर्मपालसिंह यांनीही आज भाजपमध्ये प्रवेश केला. हरीओम यादव हे अखिलेश यादव यांचे नातेवाईक आहेत. समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यांचे बंधू रतनसिंह यांचे नातू तेजप्रतापसिंह आहेत. ते खासदार आहेत. हरीओम यादव हे त्यांचे मामा आहेत. हरी ओम यादव यांना समाजवादी पक्षातून निलंबित करण्यात आले होते.

BJP
फडणवीस घरी गेलेल्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश अन् राऊतांचा अचूक बाण

भाजपच्या (BJP) उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यासह बडे नेते काल (ता. 11) दिल्लीत दाखल झाले. त्यानंतर काही तासांतच मंत्र्यांसह पाच आमदारांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. यामुळे तातडीने पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने हालचाली सुरू केल्या आहेत. आज समाजवादी पक्षासह काँग्रेसच्या आमदारांना फोडून भाजपमध्ये दाखल करून घेण्याची खेळी खेळण्यात आली.

BJP
तुमचं अपहरण झालंय का? यावर आमदार फक्त हसले...

मौर्य यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचे समर्थक मानले जाणारे आमदार रोशन लाल वर्मा, ब्रिजेश प्रजापती, भगवती सागर आणि विनय शाक्य या आमदारांनीही पक्षाचा राजीनामा दिला आहे. हे चौघेही मौर्य यांच्यासोबत समाजवादी पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. मौर्य हे ओबीसी नेते असल्याने उत्तर प्रदेशात भाजपला मोठा फटका बसू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने डॅमेज कंट्रोल मोहीम सुरू केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com