किशोर यांची भविष्यवाणी अन् भाजपवाले म्हणाले, अमित शहांनी आधीच सांगितलं होतं!

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू होती.
Prashant Kishor and Amit Shah
Prashant Kishor and Amit ShahSarkarnama

नवी दिल्ली : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) हे काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू होती. परंतु, आज त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावरच बॉम्ब टाकला आहे. याचबरोबर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपविषयीही (BJP) भाष्य केले आहे. भाजपनेही हाच मुद्दा आता उचलून धरत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा (Amit Shah) दाखला दिला आहे.

प्रशांत किशोर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. त्यात ते म्हणत आहेत की, भाजप पुढेही देशातील राजकारणाच्या केंद्रस्थानी राहणार आहे. काँग्रेस आधी 40 वर्षे देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी होती. अशीच स्थिती भाजप जिंकली अथवा हरली तरी असेल. भाजप कुठेही जाणार नाही. देशात तुम्ही एकदा 30 टक्के मते मिळवल्यानंतर लवकर तुम्ही बाहेर फेकला जात नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर संतापून जनता भाजपला सगळीकडून सत्तेतून फेकून देईल, या जाळ्यात तुम्ही अडकू नका.

भाजप हा पुढील अनेक दशके येथेच राहणार आहे. ते अनेक दशके लढा देत राहतील. राहुल गांधींची समस्या बहुदा हीच आहे. त्यांना असे वाटत आहे की देशातील जनताच आता भाजपला सत्तेतून फेकून देईल. परंतु, असे घडताना दिसत नाही. तुम्ही मोदींच्या ताकदीची दखल घेऊन तिचे परीक्षण करीत नाही तोपर्यंत तुम्हाला त्यांना शह देता येणार नाही, असे किशोर यांनी म्हटले आहे.

Prashant Kishor and Amit Shah
राहुल गांधींची अडचण म्हणजे...प्रशांत किशोर यांनी टाकला बॉम्ब

किशोर यांचा हाच मुद्दा भाजपने आता उचलला आहे. भाजप नेते अजय शेरावत म्हणाले की, भारतीय राजकारणात आगामी अनेक दशके भाजप हा महत्वाचा पक्ष राहणार आहे, अशी भविष्यवाणी प्रशांत किशोर यांनी केली आहे. त्यांच्या खूप आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी हेच भाकित वर्तवले होते.

Prashant Kishor and Amit Shah
आर्यनला अखेर जामीन; पण आज कारागृहातून सुटणार का...

गांधी परिवारातील तिन्ही सदस्यांसोबत किशोर यांची जुलै महिन्यात बैठक झाली होती. आधीही अनेक वेळा अशा बैठका झाल्या होत्या. किशोर यांनी काँग्रेसमध्ये रणनीतीकार अशी भूमिका देण्यावर प्रस्ताव समोर आला होता. ते काँग्रेसमध्ये प्रवेश करुन पक्षाचे अधिकृत रणनीतीकार म्हणून काम पाहतील, अशी शक्यता व्यक्त झाली होती. किशोर यांची गांधी परिवारासोबतची बैठक ही केवळ पंजाब आणि उत्तर प्रदेश या राज्यांतील विधानसभा निवडणुकांपुरती मर्यादित नव्हती. काँग्रेस पक्ष 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच तयारी करू लागला आहे. यात किशोर हे महत्वाची भूमिका बजावतील, असेही वाटत होते. आता या शक्यता संपुष्टात आल्याचे दिसत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com