Sadabhau Khot : भाजप नेत्यांना फडणवीसांचा धाकच उरला नाही..? सदाभाऊ खोतांनी तर टीकेची पातळीच सोडली

BJP MLA Sadabhau Khot Controversial Statement : भाजपचे आमदार सदाभाऊ खोत हे विरोधकांवर टीका करताना अनेकदा वादग्रस्त विधानं करत असतात, आज तर त्यांनी एका ज्येष्ठ नेत्याच्या आजारपणाला लक्ष्य करत टीका केली. विशेष म्हणजे, या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती.
Sadabhau Khot
Sadabhau KhotSarkarnama
Published on
Updated on

Sadabhau Khot criticized Sharad Pawar : Man is known by his company... म्हणजेच एखाद्या व्यक्तीचे मित्र कोण आहेत, तो कोणाच्या संगतीत राहतो, यावरून तो कसा आहे, चांगला आहे की वाईट आहे, हे कळते. गेल्या काही वर्षांत भाजपच्या संगतीत अत्यंत वाचाळ, सुमार, वकूब नसलेल्या काही नेत्यांचा भरणा झालेला आहे. त्यामुळेच Party with difference अशी भाजपची तयार करण्यात आलेली ओळख पुसली गेली आहे. तरीही भाजप अशा नेत्यांना उघडपणे आश्रय देत आहे. बुधवारी अशाच वाचाळ, वकूब नसलेल्या नेत्याने एका ज्येष्ठ नेत्यावर केलेल्या टीकेमुळे ऐन विधानसभा निवडणुकीत भाजपची कोंडी होणार आहे.

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या काही नेत्यांनी प्रचाराची अत्यंत खालची पातळी गाठली होती. भाजपचे(BJP) अनेक ज्येष्ठ नेते बिथरल्याप्रमाणे वागत होते. सत्तेतून येणाऱ्या अशा मुजोरीला महाराष्ट्रातील मतदारांनी वेसण घातली होती. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला महाराष्ट्रात मोठा फटका बसला. यातून कोणताही धडा भाजपच्या नेत्यांनी घेतलेला दिसत नाही.

विधानसभा निवडणुकीतही भाजपचे नेते अशीच मर्यादा सोडून टीका करणार असल्याचे संकेत मिळाले होते. बुधवारी त्याच्यावर शिक्कामोर्तब केले ते माजी राज्यमंत्री, आमदार सदाभाऊ खोत यांनी. महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करायचा आहे का, अशी मुजोर भाषा आमदार खोत यांनी एका ज्येष्ठ नेत्यासाठी त्यांच्या आजारपणाच्या अनुषंगाने वापरली आहे, तीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत!

सतत मुजोरीची भाषा वापरणारे भाजपचे अन्य एक नेते, जत (जि. सांगली) विधानसभा मतदारसंघातील उमेदवार गोपीचंद पडळकर(Gopichand Padalkar) यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत आमदार खोत यांनी आपल्या अपरिपक्वतेचे जाहीर प्रदर्शन मांडले. पडळकर यांच्या प्रचारासाठी आयोजित या सभेला उपमुख्यमंत्री फडणवीस हेही उपस्थित होते. फडणवीस यांच्या उपस्थितीतच खोत या ज्येष्ठ नेत्यावर एकेरी भाषेत टीका करत होते. या ज्येष्ठ नेत्यावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर खोत यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. अशा टीकेवर आक्षेप घेण्याचे कारण नाही, कारण सर्व नेते एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत असतात.

Sadabhau Khot
Rajesaheb Deshmukh : 'मी आमदार झालो तर सर्व पोरांची लग्न लावून देईन', शरद पवारांच्या उमेदवाराचे अजब आश्वासन

भाषेची मर्यादा न पाळता टीका करणाऱ्या नेत्यांचे गेल्या वाच वर्षांत महाराष्ट्रात पीक आले आहे. अशा नेत्यांनी महाराष्ट्राची सुसंस्कृत राजकीय परंपरा धुळीस मिळवण्याचे काम केले आहे. विरोधक असला तरी टीका करताना शब्द जपून वापरण्याची परंपरा महाराष्ट्राने जपली होती. गेल्या पाच वर्षांत ही परंपरा मोडीत निघाली आहे.

दररोज नवी खालची पातळी गाठली जात आहे. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, भाजपचे आमदार सदाभाऊ खोत हे आपल्या मुजोर देहबोलीसाठी आणि तशाच भाषेसाठी ओळखले जातात. विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोमात आलेला असताना एका ज्येष्ठ नेत्याच्या आजारपणावर सदाभाऊ खोत(Sadabhau Khot) यांनी अशीच खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारमध्ये खोत हे राज्यमंत्री होते. भाजपने त्यांना नुकतीच विधान परिषेदवर संधी दिली आहे.

एखाद्याच्या व्यंगावर, त्याच्या आजारपणावर टीका करू नये, असा संकेत समाजजीवनात आणि राजकारणातही आहे, मात्र तो आता मोडीत निघाला आहे. सर्वपक्षीय वाचाळ नेते यासाठी जबाबदार आहेत. तुलनेने अशा नेत्यांची संख्या भाजपमध्ये अधिक असल्याचे दिसून येईल. विरोधकांवर, ज्येष्ठ नेत्यांवर मानहानिकारक टीका करण्यासाठी अशा नेत्यांना त्यांच्या पक्षांकडून मोकळीक दिली जात आहे.

भाजपचे असे उथळ मानसिकतेचे, वकूब नसलेले नेते विरोधकांना नॅरेटिव्ह सेट करण्याची संधी देतात. नंतर भाजपचे नेते विरोधकांवर खोटे नॅरेटिव्ह निर्माण केल्याचा बिनबुडाचा आरोप करतात. राज्यघटना बदलण्यासाठी भाजपला 400 पेक्षा अधिक जागा हव्या आहेत, असे वक्तव्य भाजपच्या एका मोठ्या नेत्याने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केली होती. त्यावरून इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीने भाजपवर टीकेची झोड उठवली होती. महाविकास आघाडीने खोटे नॅरेटिव्ह सेट केले, अशी टीका महायुतीच्या नेत्यांकडूनही अद्यापही केली जात आहे.

Sadabhau Khot
Marathwada Politics : मराठा आरक्षण आंदोलन, 'मविआ'ची वाढलेली ताकद महायुतीला पुन्हा जेरीस आणणार?

आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपची कोंडी करण्यासाठी आमदार सदाभाऊ खोत सरसावले आहेत. आमदार नितेश राणे यांनी विशिष्ट धर्मीयांविषयी आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती, धमक्या दिल्या होत्या. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. असे प्रकार चालणार नाहीत, असा इशारा महाराष्ट्राच्या मतदारांनी भाजपला लोकसभा निवडणुकीत दिलेला आहे. तरीही भाजपचे नेते बिथरलेलेच दिसत आहेत. सदाभाऊ खोत यांनी आज वापरलेली मुजोरीची भाषा त्याचीच प्रचीती देणारी आहे. खोत यांच्या अशा भाषेतील टीकेची किंमत भाजपला विधानसभा निवडणुकीत चुकवावी लागली तर त्यात आश्चर्यकारक असे काहीही नसेल.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com