

BJP Politics : नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यापासून पहिल्यांदाच त्यांना मोठा झटका बसल्याची चर्चा आहे. जंतर मंतरवर सुरू असलेल्या जेनझींच्या आंदोलनामुळे शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. त्यामुळे अपराजित असलेल्या मोदी सरकारच्या प्रतिमेला तडा गेला.
मोदीं सरकार झुकू शकते, हे जेनझी आंदोलनाने दाखवून दिले. या आंदोलनामध्ये 'इंस्टाग्राम' या सोशल मिडिया प्लॅटफाॅर्मचा वापर करण्यात आला. त्यामुळे आता जेनझीला आपल्या बाजुने वळविण्यासाठी भाजपने तयार सुरू केली आहे.
भाजप नेहमीच निवडणूक रणनीतीमध्ये तंत्रज्ञानाचा आणि डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर केला आहे. 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत 'फेसबुक' आणि 'ट्विटर'चा वापर करून तरुणांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग निवडला होता. या दोन्ही माध्यमांवर ते प्रभावी आहेत. मात्र, जेन झी या माध्यमांपासून दूर असून ते सर्वाधिक इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह आहेत.त्यामुळे 2029 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भाजपने'जेन-झी' (Gen-Z) म्हणजेच नवमतदार आणि तरुण पिढीवरवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.
नरेंद्र मोदींनी मागील तीन दिवसांत तीन रिल्स करत तरुणांशी संवाद साधला. आंदोलन सुरू असतानाम मध्यरात्री त्यांनी व्हिडिओ करत आपल्या व्हिडिओची फ्रेंड्स अशी सुरुवात करत भावनीक जवळीक साधत तरुणाईची भाषा आपण आत्मसाद केल्याचे अप्रत्यक्ष संदेश दिला. त्यानंतर दोन वेळा त्यांनी इन्स्टावर व्हिडिओ शेअर केले आहेत. धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यातून धडा घेत त्यांनी जेनझीशी जवळीक साधण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे यातून दिसते.
भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून पक्षाच्या सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक नेत्यांना इन्स्टाग्रामवर अधिक सक्रिय होण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. केवळ खाते उघडून गप्प बसणे चालणार नाही, तर नियमितपणे अपडेट्स देणे आणि तरुणांशी संवाद साधणे अनिवार्य केले आहे.
जेन-झी पिढीशी संवाद साधायचा असेल, तर त्यांच्याच वयाचे किंवा त्यांच्या भाषेतील विचार समजणारे चेहरे पुढे आणावे लागतील, याची जाणीव भाजपला आहे. त्यामुळे पक्षाने आपल्या युवा मंत्री आणि नेत्यांवर विशेष जबाबदारी सोपवली आहे. राजकीय किंवा क्लिष्ट भाषेऐवजी सोपी, अनौपचारिक आणि 'रिलेटेबल' भाषा वापरण्याचा सल्ला या नेत्यांना देण्यात आला आहे..
परीक्षांमधील गैरप्रकार आणि पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्राने लागू केलेल्या कठोर कायद्यांतर्गत दोषींवर जलद आणि अजामीनपात्र कारवाईचे आदेश मोदींनी दिले आहेत.तसेच भविष्यातील सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये मानवी हस्तक्षेप कमी करून पारदर्शकता आणण्यासाठी नवीन AI-आधारित सुरक्षा प्रणाली आणि डिजिटल देखरेख सुरू करण्यात आली. हे सगळं आपण जेनझीसाठी करत असल्याचे संदेश दिला जत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'परीक्षा पे चर्चा' आणि विविध युवा मंचांच्या माध्यमातून तरुणांशी थेट संवाद साधण्यावर अधिक भर दिला आहे. तसेच पारंपारिक राजकीय भाषणांऐवजी तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या युट्युबर्स, पॉडकास्टर्स आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर्सच्या माध्यमातून धोरणे समजवून सांगण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. जेणेकरून जेनझीचे सरकारविषयी सकारात्मक मत बनेल.
धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे सरकार झुकल्याचे चित्र असले तरी विरोधात गेलेली तरुणाईला पुन्हा आकर्षीत करण्यासाठी भाजप अॅक्शन मोडवर काम करतो आहे. 2029 ची सार्वत्रिक निवडणूक अजून तीन वर्षे दूर असली, तरी राजकारणात वेळेच्या आधी पाऊल उचलणाराच बाजी मारतो, हे ओळखून भाजपने तयार सुरू केली आहे.
'जेन-झी' या नव्या पिढीची नाडी ओळखून, त्यांच्या आवडत्या प्लॅटफॉर्मवर (इन्स्टाग्राम), त्यांच्याच आवडत्या भाषेत आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा पूर्ण वापर करून भाजप आपला पाया मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.