Dharmendra Pradhan Resignation : 'वी हॅव ** डन इट!' धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा अन् अभिजित दिपके यांचा मोदी सरकारला थेट टोला, 34 दिवसांच्या आंदोलनाला यश (Video)

Nationwide NEET protests culminate in Dharmendra Pradhan resignation, triggering strong reactions from student leaders : दिल्लीच्या जंतर-मंतरवरील 34 दिवसांच्या विद्यार्थी आंदोलनानंतर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याचा दावा; 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजित दिपके म्हणाले, 'या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत म्हणणाऱ्यांना Gen-Z ने उत्तर दिले.'
Abhijeet Dipke reaction resignation
Abhijeet Dipke reaction resignationSarkarnama
Published on
Updated on

Dharmendra Pradhan Resigns : महिनाभरापासून चाललेले विद्यार्थ्यांचे आंदोलन अखेर आज यशस्वी ठरले. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देण्याची आंदोलकांची प्रमुख मागणी आज मान्य झाली. नीट घोटाळ्यामुळे आत्महत्या केलेल्या वीस विद्यार्थ्यांना ही श्रद्धांजली आहे, अशी भावना अभिजीत दिपके यांनी व्यक्त करताना केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारला जोरदार डिचवले.

वी हॅव डन इट! वी हॅव डन इट! धर्मेंद्र प्रधानने रिजाईन कर दिया है l वी हॅव ** डन इट! क्या कहते थे ये, क्या कहते थे, इस सरकार में इस्तिफे नहीं होते, क्या कहते थे, इस सरकार में इस्तिफे नहीं होते.., असे म्हणत अभिजित दिपके यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर खोचक टोला केंद्रातील मोदी सरकारला लगावला आहे.

अखेर आवाज उठवणाऱ्या युवकांना झुरळं ठरवणाऱ्या व्यवस्थेला कॉकरोच जनता पार्टी या उपहासात्मक पक्षाने, अशी झुरळं काय करू शकतात ते दाखवून दिले. या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत. पण आम्ही धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांना राजीनामा देण्यास भाग पाडले, असे अभिजीत दिपके म्हणाले.

दिल्लीत जंतरमंतर येथे सुरू असलेल्या युवकांच्या आंदोलनाला निर्णायक यश आले आहे. सरकारसोबतच्या चर्चेच्या दुसऱ्या फेरीत त्यांच्या तीन मागण्यांना तत्त्वतः मंजुरी झाल्या होत्या. मात्र भाजपचे (BJP) शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी या बैठकीत युवकांनी कोणतीही तडजोड न करण्याचा इशारा दिला होता.

Abhijeet Dipke reaction resignation
Gen-Z Student Protest : 'Gen-Z'वर पोलिसांचा अत्याचार वाढला, ठाकरेंचा शिलेदार संतापला; न्याय व्यवस्थेला सुनावत एकाचवेळी वाघ, राणे, पडळकर अन् जगतापांवर बरसला

प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय कुठल्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे आंदोलकांनी सरकारला ठणकावून सांगितले आहे. ‘आजची चर्चा सकारात्मक झाली असून, प्रधान यांचा राजीनामा ‘लोड’ होतोय, तोपर्यंत असेच ठाम उभे राहा,’ असे आवाहन कॉक्रोच जनता पार्टी उपहासात्मक आंदोलनाचा संस्थापक अभिजित दीपके यांनी केले होते.

Abhijeet Dipke reaction resignation
BJP MLA Security Guard Case: सरकारी रुग्णालयात परिचारिकेला दमदाटी; भाजप आमदाराच्या सुरक्षा रक्षकावर गुन्हा, सेवेतून हकालपट्टी

सोनम वांगचुक यांचे बेमुदत उपोषण

अभिजित दिपके आणि त्यांच्या 'कॉकरोच जनता पार्टी'चे दिल्लीतील जंतर-मंतरवर गेल्या 34 दिवसांपेक्षा जास्त काळापासून हे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन 6 जून 2026 रोजी सुरू झाले होते. सोनम वांगचुक यांनी आंदोलनात बेमुदत उपोषण करून आंदोलनाची धार वाढवली होती. परंतु गेल्या चार ते पाच दिवसांपासून हे आंदोलन चिघळले. दिल्ली पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडून त्रास दिला. आंदोलक मुलींना टार्गेट करून छळ केला.

'Gen-Z'चे देशातील 150 हून अधिक शहरांमध्ये आंदोलन

यानंतर आंदोलन देशभर सुरू झाले. देशातील 150 हून अधिक शहरांमध्ये आंदोलन सुरू झाले. महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या मेट्रो शहरात गेल्या पाच दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे हे आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत.

वंचितकडून महाराष्ट्र बंद प्रयोग

वंचित बहुजन आघाडीने देखील गुरूवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला देखील सकारात्मक प्रतिसाद मिळाला. यातून केंद्रातील आणि राज्यातील भाजप प्रणित सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला होता. यातच विद्यार्थी आंदोलक धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम असल्याचे सांगून, तिथे कुठेही तडजोड होणार नाही, असा सूचक इशारा दिला होता.

मोदी सरकारला 'Gen-Z'ने झुकवले

धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच, कॉक्रोचचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारला खिजवणारी प्रतिक्रिया दिली आहे. अभिजित दिपके यांची ही प्रतिक्रिया आता चर्चेत आहे. मोदी सरकार गेल्या 12 वर्षात पहिल्यांदाच असे झुकले आहे आणि ते देशातील 'Gen-Z'ने झुकवले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com