BJP Politics : भाजपचे ‘रामनाम जपना... पराया नेता अपना’

Lok Sabha Election BJP Strategy In Maharashtra : बॅनरवर बाळासाहेबांनंतर यशवंतराव; भविष्यात शरद पवारांची शक्यता...
Mahayuti Banner
Mahayuti BannerSarkarnama
Published on
Updated on

सचिन देशपांडे -

BJP Politics In Maharashtra :

‘आमचे ते आमचे आणि तुमचे तेपण आमचेच’ अशी नेहमीच राजकीय सोयीची भूमिका भाजपची असते. या सोयीच्या भूमिकेतूनच महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठीचे उसने प्रेम भाजपच्या नेत्यांना नेहमीच असते.

भाजपनेते नेहमी याविषयी ट्रोल होत आले आहेत. महायुतीचा भाग म्हणून शिवसेना संस्थापक हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर आता थेट राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे श्रद्धास्थान यशवंतराव चव्हाण यांचेदेखील भाजपला प्रेम वाटणे सुरू झाले आहे.

एकीकडे ‘रामनाम जपना… पराया नेता अपना’ अशी काय ती सोयीची भूमिका भाजपची सर्वदूर आहे. या सोयीच्या भूमिकेतून भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते Sharad Pawar यांचाही फोटो बॅनरवर लागला तर आश्चर्य वाटू देऊ नये, अशी भाजपची भूमिका भविष्यात असू शकते.

Mahayuti Banner
INDIA Aghadi : मराठी नेत्यांना गृहित धरत दिल्लीश्वरांनी ठरवला महाराष्ट्राचा फॉर्म्युला; स्वाभिमानी मराठी नेते झुकतील ?

पुण्यातील फोटोवरून भाजपची झलक!

भाजपच्या सोयीच्या भूमिकेचा इतर राजकीय नेत्यांना व पक्षांना त्रास होत असला तरी इतर राजकीय नेते भाजपाच्या नेत्यांचे फोटो बॅनरवर लावू शकत नाहीत. ही मोठी अडचण या पक्षाची आहे. यशवंतराव चव्हाण यांचा फोटो घेतल्यानंतर भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते शरद पवार यांचेही फोटो चोरण्यात भाजप मागे-पुढे पाहणार नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपसोबत महायुतीत आहे, त्यामुळे शरद पवार यांचा फोटो भविष्यात महायुतीच्या संयुक्त मेळाव्यात लावले जाऊ शकतात. मराठा मतदारांना प्रभावित करण्यासाठी भाजप काहीपण करू शकते, याचा अंदाज पुण्यातील फोटोवरून अनेकांना आला असेल.

भाजपच्या बॅनरवर श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे फोटो अगदी मोजक्याच प्रसंगात असतो. भाजपच्या काही नेत्यांना तर या दोन महान विभूती कोण होत्या, याची माहितीदेखील नसेल. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांचे फोटो तर भाजपच्या बॅनरवर शोधून सापडत नाहीत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यशवंतराव चव्हाण यांचा फोटो बॅनरवर

महायुतीच्या मेळाव्यांची जोरदार तयारी भाजपने सुरू केली आहे. राज्यात 14 ते 22 जानेवारीपर्यंत भाजपसह शिवसेना (शिंदे गट) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), आरपीआय (आठवले गट) यांनी एकत्र येऊन महायुतीचे मेळावे आयोजिले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून हे मेळावे होणार आहेत. पुण्यात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लावण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, देशाचे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे नेते अशी यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दलची ओळख आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेता शरद पवार यांनी नेहमीच यशवंतराव चव्हाण यांना आदर्श मानले.

काँग्रेसचे नेते असलेले यशवंतराव चव्हाण यांचा फोटो महायुतीच्या बॅनरवर लावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अजित पवार गटाचे प्रतिनिधित्व म्हणून हा फोटो आहे. पण भविष्यात अजित पवार गटाचे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते शरद पवार यांचेदेखील फोटो महायुतीच्या बॅनरवर झळकतील काय, असा संशय आणि प्रश्न विचारला जात आहे.

edited by sachin fulpagare

R...

Mahayuti Banner
Maharashtra Politics: रेडा दूध देत नाही, हे त्रिकालाबाधित सत्य, मात्र काहींना ते कळलेच नाही...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com