BJP–NCP Secret Alliance: राष्ट्रवादी -भाजपची छुपी युती धोक्यात? अनिल देशमुख, आमदार ठाकूर यांना भिडावेच लागणार!

Anil Deshmukh vs Charan Thakur Local Body Election : मागील अनेक वर्षांपासून भाजप-राष्ट्रवादीमध्ये छुपी युती असल्याची चर्चा होती. मात्र, ठाकूर आमदार झाल्याने समीकरणे बदलल्याची चर्चा आहे.
charansingh Thakur, Anil Deshmukh
charansingh Thakur, Anil DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Anil Deshmukh Politics : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बालेकिल्ल्याला विधानसभेच्या निवडणुकीत मोठा हादरला बसला आहे. भाजपच्या चरण ठाकूर यांनी देशमुखांचे पुत्र सलील देशमुख यांना पराभूत केले आहे. एकेकाळी नगरपरिषदेचे खेळाडू म्हणून ओळखले जाणारे ठाकूर व त्यांचा गट आता भाजपात विलीन झाला असल्याने नगर पालिका आणि नगर पंचायती जिंकण्यासाठी देशमुख गटाला यावेळी चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

या मतदारसंघात आजवर झालेल्या निवडणुकीच्या निकालावरून शहर आणि ग्रामीण अशी विभागणी करून ठाकूर आणि देशमुख यांची छुपी युती असल्याची चर्चा नेहमीच रंगत होती. आता मात्र आपसी समझोत्याचा स्कोप दोघांनाही राहिला नाही. आपल्या राजकीय अस्तित्वासाठी दोघांनाही स्थानिक निवडणुका जिंकाव्या लागणार आहे.

अनिल देशमुख यांच्या डोक्यावर सुमारे 25 वर्ष लालदिवा होता. काँग्रेसच्या बड्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. असे असताना त्यांनी आपला राजकीय वावर आपल्या काटोल-नरखेड विधानसभा मतदार संघापुरता मर्यादित ठेवला. या मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही आजवर त्यांनी तडजोडीचेच राजकारण केले. त्यांच्या मतदारसंघात काटोल, नरखेड आणि मोवाड या तीन नगर परिषदा आहे. मात्र काटोल नगर पालिकेच ठाकूर गटाचीच प्रामुख्याने सत्ता होती. स्वतः आमदार ठाकूर नगराध्यक्ष होते. त्यावरून देशमुख आणि ठाकूर यांनी आपसात अलिखित करार केला असल्याची चर्चा रंगत होती.

आता मात्र ठाकूर हे मतदारसंघाचे नेते झाले आहे. त्यांच्यासोबत भाजपची फळी आहे. नरखेड व मोवाडमध्ये मात्र देशमुखांचा चाहता वर्ग अधिक आहे. विधानसभा, जिल्हा परिषदेत वेगवगेळ्या पक्षाचे उमेदवार या परिसरातून आजवर निवडून आले आहेत. विधानसभेत देशमुखांना पराभवाचा धक्का बसल्याने आता यावेळी त्यांना गटातटाचे राजकारण सोडून राष्ट्रवादी काँग्रेसवर अधिक फोकस करावा लागणार आहे.

मागील निवडणुकीत मोवाडमध्ये भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला होता. नरखेडमध्ये राष्ट्रवादी आणि सहकारी गटाची सत्ता होती. काटोल मतदारसंघात तीन नगर परिषद आणि नव्याने कोंढाळी नगर पंचायत झाली. यामुळे चार नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या निवडणुका होत आहेत. काटोल शहरी आणि ग्रामीण भागात शेकापचे राहुल देशमुख यांचाही प्रभाव आहे. ते काटोलचे नगराध्यक्षही राहिले आहेत.

मागील निवडणुकीमध्ये चरणसिंग ठाकूर यांच्या विदर्भ माझा आघाडीचे १८ नगरसेवक निवडून आले होते. मात्र, भाजपची सत्ता असल्याने त्या काळात १८ नगरसेवक आणि नगराध्यक्ष अपात्र करण्यात आले. तेव्हापासून तिथे प्रशासकराज सुरू होते. आमदार ठाकूर यांचा काटोल शहरात प्रभाव असला तरी ग्रामीण भागात त्यांना कायम यश मिळाले नाही. त्यामुळेच ठाकूर आणि देशमुख यांच्या छुपी युती असल्याच्या चर्चाही दरम्यानच्या काळात रंगल्या होत्या.

charansingh Thakur, Anil Deshmukh
Beed News : बीड जिल्ह्यात भाजपला वातावरण पोषक, पण पंकजा मुंडे, सुरेश धस यांची अद्याप बैठकच नाही!

ठाकूर-देशमूख यांच्यात संघर्ष होणार

नरखेडमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. नगर विकास आघाडीला ५ तर राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागा मिळाल्या होत्या. शिवसेना आणि अपक्षाला प्रत्येकी केवळ एक जागा मिळाली होती. मोवाड नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची अनेक वर्षे सत्ता होती. मात्र, मागील निवडणुकीत भाजपची सत्ता आली. भाजपने नगराध्यक्षासह ९ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली. राष्ट्रवादीने पाच जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेला दोन जागा मिळाल्या होत्या. यावेळी अनिल देशमुख आणि ठाकूर यांना आपली सत्ता टिकवण्यासाठी चांगलाच संघर्ष करावा लागणार असल्याचे दिसून येते.

charansingh Thakur, Anil Deshmukh
NCP Politics : राष्ट्रवादीची नवी यादी जाहीर! चाकणकरांना पुन्हा संधी मिटकरींचीही वर्णी, पण रूपाली ठोंबरे वेटिंगवरच...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com