
बिहारमध्ये बीपीएससी परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या दोन आठवड्यांपासून पाटण्यात विद्यार्थी आंदोलन करत आहेत. मात्र आयोगाने विद्यार्थ्यांची ही मागणी फेटाळून लावली आहे. रविवारी पोलिसांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर सौम्य लाठीचार्ज आणि पाण्याच्या फवाऱ्याचा वापर केल्याने हे प्रकरण अधिकच तापले आहे. ज्यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले असून विद्यार्थी मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर ठाम आहेत.
बिहार लोकसेवा आयोगाची परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या उमेदवारांच्या आंदोलनाला आता राजकीय रंग चढला आहे. सरकारविरोधात विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या प्रकरणात उडी मारली आहे, त्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. सर्वच पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाचा फेरी चालवत आहेत.
प्रशांत किशोर यांच्या जन सूराज पार्टीने शनिवारी पाटणा येथील गांधी मैदानावर विद्यार्थी संसदेचे आयोजन केले होते. याची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली होती. मात्र जिल्हा प्रशासनाने ही विनंती फेटाळली. तरीही प्रशात किशोर यांनी मैदानावर अनधिकृतपणे जमाव गोळा केला, निषेध भडकावला आणि कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे पाटणा पोलिसांनी आहे.
बीपीएससीच्या 70 व्या परीक्षेच्या संदर्भात बिहारमधील पाटणामध्ये रविवारचा दिवस खूप गरम होता. परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या उमेदवारांवर कडाक्याच्या थंडीत पोलिसांनी लाठीचार्ज करण्याबरोबरच पाण्याच्या तोफांचाही वापर केला. ज्यामध्ये अनेक विद्यार्थी जखमीही झाले आहेत. स्पर्धक विद्यार्थी मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर ठाम राहिले. जन सूरज पार्टीचे संस्थापक प्रशांत किशोर हेही विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलनस्थळी पोहोचले. यानंतर विद्यार्थी संतापले. मात्र, लाठीचार्ज होण्यापूर्वीच ते तेथून निघून गेले.
लाठीमाराच्या निषेधार्थ ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशन (AISA) सह विविध संघटनांनी बिहार बंदची हाक दिली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्याच वेळी, मुख्य सचिवांनी म्हटले आहे की सरकार बीपीएससी विद्यार्थ्यांनाशी चर्चेसाठी तयार आहे. उमेदवारांसाठी सरकारचे दरवाजे खुले आहेत. बीपीएससी प्रोटेस्टचे अनेक मोर्चे आहेत जे बिहारमध्ये (Bihar) राजकीय लढाईचे केंद्र बनत आहेत. BPSC विरुद्ध उमेदवार, सरकार विरुद्ध उमेदवार, सत्ताधारी विरुद्ध विरोधक यासोबतच या विषयात विरोधक विरुद्ध विरोध अशीही आघाडी आहे.
मुख्यमंत्री नितीश कुमार आणि त्यांचे सरकार हे राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) आणि जन सूराज या दोन्ही विरोधी पक्षांच्या निशाण्यावर आहेत. मुख्यमंत्री नितीश यांच्यावर हल्लाबोल करत तेजस्वी यादव (Tejasvi Yadav) म्हणाले की, ते आता थकले आहेत आणि निवृत्त अधिकाऱ्यांसोबत राज्य चालवत आहेत.
नितीश कुमार यांच्या सांगण्यावरून विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली आणि ज्या पद्धतीने त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला ते हृदय पिळवटून टाकणारे आहे. यावेळी त्यांनी लाठीचार्जचा देखील निषेध केला आहे. तसेच नितीश कुमार शुद्धीवर नसल्याचे सांगितले, यादव यांनी अशी खरमरीत टीका यावेळी केली. बिहार सरकारने विद्यार्थ्यांवर अत्याचार केले आहेत. आम्ही विद्यार्थ्यांसोबत आहोत आणि परीक्षा पुन्हा घ्याव्यात अशी मागणी यादव यांनी केलीये.
बिहार लोकसेवा आयोगाची 70 वी एकत्रित स्पर्धात्मक (प्राथमिक) परीक्षा 13 डिसेंबर रोजी घेण्यात आली. परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप विद्यार्थी करत आहेत आणि परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी देखील करत आहेत. मात्र, आयोगाने केवळ पाटणा येथील बापू परीक्षा संकुल केंद्रावर होणारी परीक्षा रद्द करून 4 जानेवारी रोजी पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे प्रवेशपत्रही जाहीर झाले आहे. या केंद्रावर सुमारे 12000 उमेदवारांनी परीक्षा दिली. आता या उमेदवारांची परीक्षा ४ जानेवारीला पाटणा येथीलच अन्य केंद्रावर होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.