Chandgarh Assembly Constituency : चंदगडमधून सर्वाधिक इच्छुक रिंगणात; महायुती, माविआत रस्सीखेच

Political News : चंदगडमधून सर्वाधिक इच्छुक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीत उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच आहे.
Mahayuti Vs MVA
Mahayuti Vs MVASarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : आगामी काळात होत असलेली विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. महायुती व महाविकास आघाडीची जागावाटपाची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. त्यामुळे सर्वच पक्षातील इच्छुक उमेदवाराची धाकधूक वाढली असतानाच चंदगडमधून सर्वाधिक इच्छुक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीत उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार गटाचे राजेश पाटील हे आमदार आहेत. पण भाजपचे (BJP) शिवाजी पाटील हे विधानसभेसाठी इच्छुक आहेत. शिवाजी पाटील हे देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय समजले जातात. 2019 साली त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या राजेश पाटील यांना निसटता विजय झाला होता. (Chandgarh Assembly Constituency News )

गेल्या पाच वर्षांपासून शिवाजी पाटील यांनी भाजपचे काम सुरू केले आहे. त्यांनी गेल्या काही दिवसात चंदगड तालुक्यामध्ये भाजप घराघरात पोहोचवला. त्यामुळे यंदा भाजपकडून शिवाजी पाटील हेच उमेदवार असणार हे नक्की होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या उभ्या फुटीनंतर या ठिकाणचे चित्र बदलले आहे. अजित पवार महायुतीमध्ये सहभागी झाल्याने याठिकाणचे गणिते बदलली आहेत. चंदगडचे आमदार राजेश पाटील हे अजित पवारांसोबत गेल्याने शिवाजी पाटलांची गोची झाल्याचे दिसत आहे.

चंदगडला सर्वाधिक इच्छुक

चंदगड विधानसभा निवडणुकीसाठी सर्वाधिक इच्छुक उमेदवार आहेत. येथील विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेश पाटील हे आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे विनायक पाटील, विद्याधर गुरुबे, गोपाळराव पाटील हे इच्छुक आहेत तर जनता दलाकडून स्वाती कोरी हे इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून नंदा बाभुळकर, अमर चव्हाण, विद्याधर खोराटे इच्छुक आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून रियाज शमनजी, सुनील शिंत्रे, प्रभाकर खांडेकर हे इच्छुक आहेत

महायुतीत शिवसेना शिंदे गटाकडून अनिरुद्ध रेडेकर भाजपकडून शिवाजीराव पाटील, संग्राम कुपेकर यांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये आणखी काही उमेदवार रिंगणात उतरू शकतात. जनता दलाच्या स्वाती कोरी यांनी मेळावा घेऊन निवडणूक लढण्याच्या संकेत दिले आहेत.

Mahayuti Vs MVA
Mahayuti News : अखेर शिरसाट, अडसूळ यांची इच्छापूर्ती; शिंदे सरकारकडून मोठं बक्षीस; गोगावलेंचं काय ?

उमेदवार कोण याची उत्सुकता

ज्या ठिकाणी जो आमदार ती जागा त्या पक्षाची असा फॉर्म्युला ठरला आहे. त्यामुळे याठिकाणी भाजपच्या इच्छुकांची अडचण झाली. त्यामुळेच भाजपचे जिल्ह्यातील बडे नेते समरजित घाटगे यांनी शरद पवारांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. हा भाजपसाठी मोठा धक्का आहे. तसाच धक्का चंदगडमध्ये बसू नये, यासाठी देवेंद्र फडणवीस सक्रिय झाल्याचं दिसत आहे.

त्यामुळे त्यांनी अप्रत्यक्षपणे का होईना पण चंदगडमधून शिवाजी पाटील हेच उमेदवार असतील असे सूचवलं आहे. शिवाजी पाटील हे मूळचे चंदगडमधील इनाम सावर्डे या गावचे आहेत. उद्योगधंद्याच्या निमित्ताने ते ठाण्यामध्ये असतात. शिवाजी पाटील हे सध्या चंदगड विधानसभा भाजप निवडणूक प्रमुख आहेत.

उत्सुकता पोहचली शिगेला

दुसरीकडे या ठिकणी इच्छुक असलेल्या अजित पवार गटाचे आमदार राजेश पाटलांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आमदार म्हणून चंदगडची जागा आपल्यालाच मिळेल असे समजून ते कामालाही लागले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात काय होणार याची उत्सुकता लागली आहे.

Mahayuti Vs MVA
Aditi Tatkare News : महिलांसाठी आर्थिक सुरक्षा महत्त्वाची; आदिती तटकरेंनी दिले विरोधकांच्या टीकेला उत्तर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com