जप करून मी रुग्ण बरे केले आहेत, : चंद्रकात खैरे यांचा अजब दावा

जप करून मी रुग्ण बरे केले आहेत, : चंद्रकात खैरे यांचा अजब दावा

औरंगाबाद : शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे हे त्यांच्या विविध वक्तव्यावरून नेहमीच चर्चेत राहतात आज खासदार खैरे हे चक्क चमत्कारिक बाबा बनले. राज्य शासनाच्या वतीने आयोजित आरोग्य मेळाव्यात बोलताना त्यांनी मी रुग्णाची नाडी धरून जप केला तर रुग्ण बरे होतात. दिवंगत प्रमोद महाजन यांना रुग्णालयात समक्ष भेट न झाल्याने मी जीवनात एकदाच फेल झालो. असे वक्तव्य केल्याने पुन्हा नवीन वाद उफाळण्याची शक्‍यता आहे. 

सार्वजनिक आरोग्य विभाग व राष्ट्रीय आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील खडकेश्वर भागात मोफत आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी असलेल्या खैरे यांनी त्यांच्या भाषणात आरोग्याबाबत रुग्णांना उपदेश केला. दरम्यान मंचावर शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता कानन यांना उद्देशून त्यांनी माझ्याकडे डॉक्‍टरची डिग्री नाही. पण मी अनेक लोकांना बरे केले आहे. संध्याकाळ पर्यंत मृत्यू होईल असे डॉक्‍टरांनी घोषित केलेले रुग्ण मी नाडीला हात लावून जप केला तर बरे झाल्याची उदाहरणे आहेत. 

प्रमोद महाजन रुग्णालयात असताना मला भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी काही तरी करा असे म्हटले होते. मी बाबांनी दिलेली एक पुडी त्यांच्या उशी खाली ठेवायला सांगितली होती. मी त्यांची नाडी धरून जप म्हणू शकलो नाही. त्यामुळे मी फेल झालो असे खैरे म्हणाले 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com