अमितभाईंची भेट का नाही? अखेर चंद्रकांतदादांनीच सांगितलं कारण

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे शनिवारपासून दिल्ली भेटीवर होते. परंतु, त्यांची अमित शहांशी भेट होऊ शकली नाही.
chandrakant patil clarifies about not meeting amit shah
chandrakant patil clarifies about not meeting amit shah
Published on: 
Updated on: 

मुंबई : महाराष्ट्र भाजपमधील (BJP) ज्येष्ठ नेते गेल्या काही दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची (Amit Shah) भेट घेतली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हेसुद्धा शनिवारपासून दिल्ली भेटीवर होते. परंतु, त्यांची शहांशी भेट होऊ शकली नाही. यावर अखेर चंद्रकांत पाटील यांनीच खुलासा केला आहे. 

चंद्रकांत पाटील यांची चार दिवसांच्या दिल्ली दौऱ्यात अमित शहांची भेट झाली नाही. चंद्रकांत पाटील यांना संघटन महामंत्री बी. एल. संतोष आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या भेटीवरच समाधान मानण्याची वेळ आली. यावरुन मोठी चर्चा सुरू झाली. पाटील हे दिल्लीतून आज मुंबईत दाखल झाले. अखेर त्यांनी या प्रकरणी खुलासा केला आहे.  

एका वृत्तवाहिनीशी बोलताना पाटील म्हणाले की,  हा नेहमीचा दिल्ली दौरा होताअतिशय रुटीन होता. देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, विनोद तावडे आणि माझे वारंवार दिल्लीला जाणे होते. पुढची पिढी तयार करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न आहे. त्यामुळे राम शिंदे, संजय कुटे, जयकुमार रावल, चंद्रशेख बावनकुळे, श्रीकांत भारती या नेत्यांना घेऊन केंद्रात मंत्री झालेल्या भागवत कराड, भारती पवार, कपिल पाटील यांना भेटलो. त्यांचे अभिनंदन करणे त्यांची खाती समजून घेणे हा यामागील उद्देश होता. 

कोरोना महामारीच्या आधी महाराष्ट्रातील खासदारांसोबत भोजन होत असे. यातील राज्यातील मुद्दे आणि प्रश्न यावर चर्चा होत असे. परंतु, कोरोनामुळे मागील दोन वर्षात याला खीळ बसला होता. काल रात्री रावसाहेब दानवेंकडे जेवण झाले. अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट सोडली तर सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या. दिल्लीत सध्या संसद अधिवेशन सुरु आहे. अमित शाहांनी भेट नाकारली या चर्चेत काहीही अर्थ नाही. त्यांची भेट झाली असती तर नक्कीच आनंद झाला असता, असे पाटील यांनी स्पष्ट केले. 

गेले चार दिवस चंद्रकांत पाटील दिल्लीत होते. भाजप राज्य पदाधिकाऱ्यांसह त्यांनी अमित शहा यांची वेळ मागितली होती. परंतु, अमित शहा यांनी भेटण्यासाठी वेळ दिली नाही, अशी सूत्रांची माहिती आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांची अमित शहा यांच्यासोबत दीड तास भेट झाली होती. राज्य संघटनेतील प्रमुख व्यक्तीला अमित शहा यांना भेटण्याचे टाळल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटून दिल्लीत गेले होते. त्यामुळे दिल्लीत भाजप-मनसे युतीबाबत चर्चा होण्याची शक्यता होती. यात भाजप आणि मनसे युतीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.  
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.