मुंबई : भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी राज्यात राज्यात मध्यवधी निवडणूक लागू शकतात, असे वक्तव्य केले होते. त्या विषयी बोलातना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, मध्यवधी निवडणुका लागल्या तरी आमची तयारी पूर्ण आहे. सरकार आम्ही तयार करू इतके बहुमत मिळू शकेल, असा दावा त्यांनी केला.
या वेळी पाटील म्हणाले, आमची बुथनिहाय तयारी झालेली आहे. २८८ मतदारसंघ लढलो तर २ कोटींपर्यंत मते मिळवू शकतो. महापालिका निवडणुकांसाठी आमची स्वबळावर महापालिका जिंकण्याची तयारी झाली आहे. सर्व्हेसुद्धा तसेच येत आहेत. त्यामुळेच राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात एकत्र येण्याची भाषा करत, असल्याचा टोला पाटील यांनी लगावला.
भाजप-मनसे युतीवर बोलताना पाटील म्हणाले, भाजप-मनसे युतीचा निर्णय इतका सहजा सहजी होणार नाही. त्या युतीचे इतर राज्यात काय परिणाम होतील यावर चर्चा करावी लागेल. हा निर्णय राष्ट्रीय पातळीवर घेतला जाईल. राजकारणात वेध घ्यायचा असतो. केंद्राने आम्हाला एकटे लढण्यास सांगितले, असल्याचे पाटील यांनी सांगितले. शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाची आस निर्माण झाली होती. त्यामुळेचे त्यांनी हिंदुत्वाचे नुकसान केले, असा आरोप पाटील यांनी केला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत काहीही म्हणो शिवसेनेने स्वार्थ पाहिला हे सर्वांना माहिती, असेही पाटील म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.