Chandrasekhar Bawankule: उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते त्यांना सोडून का जात आहेत? बावनकुळेंनी सांगितलं कारण

Chandrasekhar Bawankule on Uddhav Thackeray’s Workers Leaving party: काँग्रेस व इतर पक्षाने दुखावलेले तसेच पक्षावर नाराज असलेल्या माजी नगसेवकांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. निवडणूक जाहीर होताच अनेकजण भाजपमध्ये आल्याचे दिसतील.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: उद्धव ठाकरे यांना सोडून एक एक नेता जात आहे. विरोधकांच्यावतीने 'शिल्लक सेना' अशी खिल्ली उडवली जात आहे. बहुतांश नेते आणि कार्यकर्ते भाजपात जात आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून भाजपने फोडाफोडीचे राजकारण बंद करावे, अशी टीका केली आहे.

यावर भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याचे आत्मचिंतन ठाकरे यांनीच करावे असा सल्ला दिला. त्यांना आपले कार्यकर्ते सांभाळता येत नाही, कोणाला भेटायला त्यांना वेळ नाही तर कार्यकर्ते पक्ष सोडणार नाही तर काय करणार असा सवालही बावनकुळे यांनी केला. बावनकुळे यांनी यावेळी अधिकाधिक कार्यकर्ते भाजपात का येत आहे याचेही उत्तर दिले.

ते म्हणाले, "भाजपमध्ये सर्वच एकमेकांसाठी उपलब्ध असतात. भाजपचे नेते आणि १३७ आमदार सर्वांच्या संपर्कात असतात. म्हणून इतर पक्षातील कार्यकर्ते आमच्यासोबत जुळत असल्याचा दावाही त्यांनी केला. भाजपमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. नागपूर ग्रामीणमधील आतापर्यंत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे चार जिल्हा परिषद सदस्य व त्यांचे समर्थक भाजपता सामील झाले आहेत. असेच चित्र राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येसुद्धा आहेत.

नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत यावेळी भाजपचे १३० नगरसेवक निवडूण आणण्याचे टार्गेट ठेवले आहेत. काँग्रेस व इतर पक्षाने दुखावलेले तसेच पक्षावर नाराज असलेल्या माजी नगसेवकांच्या संपर्कात भाजपचे नेते असल्याचे बोलले जात आहे. निवडणूक जाहीर होताच अनेकजण भाजपमध्ये आल्याचे दिसतील, असा दावा भाजप नेत्यांमार्फत केला जात आहे. भाजपने महापालिकेच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.

Chandrashekhar Bawankule
Raj Thackeray: गुजराती व्यापाऱ्याला मारहाण व्हिडिओ; राज ठाकरेंच्या विरोधात पोलिस महासंचालकांकडे तक्रार

विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रचार सुरू केला आहे. राज्यात भाजपची सत्ता आहे. शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामांचा धडाका सुरू आहे. विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीचा कौल भाजपच्या बाजूने लागला आहे.

भाजप निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने उतरतो. उमेदवारांना आर्थिक तसेच पक्षाच्या पातळीवरही मोठी मदत केली जात आहे. याउलट इतर पक्षांच्या उमेदवारांना आपल्याच बळावर लढावे लागते. चार सदस्यांच्या प्रभागात निवडणूक लढण्यासाठी मोठा पाठबळ लागते. हे बघून अनेकजण भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com